Friday, May 3, 2024
Homeनगरअवघड शाळांच्या यादीवर 154 हरकती

अवघड शाळांच्या यादीवर 154 हरकती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक असणार्‍या अवघड क्षेत्रातील शाळांची प्रारूप निवड यादी सोमवार जाहीर करण्यात आली होती. आठ तालुक्यात 386 शाळा अवघड क्षेत्रातील घोषीत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, जाहिर करण्यात आलेल्या प्रारूप यादीतील शाळांवर 154 शिक्षकांनी हरकत घेत त्यांच्या शाळा अवघड क्षेत्रातील शाळा म्हणून पात्र असल्याचे म्हणणे मांडले आहे.

- Advertisement -

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी नक्षलग्रस्त अथवा पेसा गाव क्षेत्रात असणार्या प्राथमिक शाळा, वार्षिक सरासरी पर्जन्यमान 2 हजार मिलीमीटर पेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारी गावे, हिस्त्र वन्य प्राणी उपद्रव असणारा जंगल प्रदेश, वाहतूकीच्या सुविधांचा अभाव असणारे गावे, तसेच वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव, रस्त्याने न जोडलेल्या शाळा (बस, रेल्वे आणि अन्य सार्वजनिक वाहतूक), संवाद छायेचा प्रदेश (बीएसएनएलचा अहवालानूसार), डोंगरी भाग प्रदेश (नियोजन विभागाचा शासन निर्णय) राष्ट्रीय, राज्य मार्गापासून दहा किलो मीटर पेक्षा जास्त दूर असणार्‍या गावातील शाळांचा समावेश अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या गावातील शिक्षक बदलीसाठी पात्र असून आपली शाळा अवघड क्षेत्रातील शाळा घोषित व्हावी, यासाठी शिक्षकांचा प्रयत्न सुरू आहे.

मात्र, अवघड क्षेत्रातील गावे आणि शाळा निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम (राज्य सरकार) यांच्यासह वन्य विभाग, महसूल विभाग, बीएसएन विभाग यांच्याकडील अहवालानूसार यादी घेवून त्यांचा अवघड क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषद पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. त्यात उपजिल्हाधिकारी निवडणूक, कार्यकारी अभियंता जि. प. बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, विभाग नियंत्रक एसटी विभाग आणि शिक्षणाधिकारी हे सदस्य आहे. आता अवघड क्षेत्रातील शाळांची प्रारूप यादी प्रसिध्द झाल्या असून त्यावर 154 हरकती आल्या असून त्या हरकती तपासून पुढील आठवड्यात अवघड क्षेत्रातील शाळांची अंतिम यादी प्रसिध्द होणार आहे.

हरकतींचे तालुके…

नगर 2, जामखेड 15, शेवगाव 12, संगमनेर 41, अकोले 35, पाथर्डी 13, राहुरी 12, पारनेर 17, श्रीगोंदा 7 आणि कर्जत 1 अशा आहेत. कोपरगाव, नेवासा, श्रीरामपूर आणि राहाता या तालुक्यातून एकही हरकत आलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या