Friday, May 3, 2024
Homeराजकीयराज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aaghadi Government ) एकीकडे सत्तेच्या माध्यमातून दादागिरी आणि दडपशाही करत असतानाच दुसरीकडे सत्ताधारी आघाडीला विरोध करणाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवत आहे. यातून राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती पूर्ण बिघडली आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil ) यांनी शनिवारी पुण्यात ( Pune )बोलताना केला.

- Advertisement -

आमदार रवि राणा ( MLA Ravi Rana )आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा ( MP Navnit Rana )यांच्या हनुमान चालिसा ( Hanuman Chalisa )पठणवरून शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यात जुंपली आहे. शिवाय काल, शुक्रवारी रात्री भाजपचे मुंबईतील पदाधिकारी मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीका केली.

मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर मोहित कंबोज ( Mohit Kamboj- BJP )यांच्या गाडीवर काल रात्री तीनशे ते चारशे जणांच्या जमावाने हल्ला केला. त्या आधी भाजपच्या मुंबईतील पोलखोल यात्रेच्या रथाची मोडतोड करण्यात आली.

हल्लेखोर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे आढळले. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यास निघाले तर त्यांच्या मुंबईतील घराबाहेर जमाव जमवून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. एखाद्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर काही पोस्ट केली तर शिवसैनिक घरात घुसून दमबाजी करतात. राज्यात हुकुमशाही आली का, आणीबाणी लागू झाली का, असे प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे, असे पाटील म्हणाले.

कमिशनसाठी भारनियमन

दरम्यान, वीज खरेदीत कमिशन मिळावे यासाठी राज्यात कृत्रिम वीज टंचाई निर्माण करून लोडशेडिंग केले जात आहे, असा आरोप पाटील यांनी केला.

वीज भारनियमनामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाणी उपलब्ध असून शेतकरी ते पिकांना देऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार होते त्यावेळी पाच वर्षे राज्यात लोडशेडिंग बंद होते. पण आता पुन्हा कमिशनसाठी लोडशेडिंगचे कृत्रिम संकट आणले आहे. भाजप हे सहन करणार नाही. याच्या विरोधात आम्ही उद्यापासून आंदोलन करत आहोत, असेही चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या