Friday, May 3, 2024
HomeनाशिकVideo : ...अन् असा उतरला मांजरगावातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा

Video : …अन् असा उतरला मांजरगावातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा

घोटी | Ghoti

उन्हाळा (Summer) म्हटलं की आठवते पाणी टंचाई (Water scarcity). पण यावर मात करत पाणी टंचाई मुक्त झाले ते इगतपुरी तालुक्याच्या पूर्व दुर्गम डोंगराळ भागातील मांजरगाव (Manjargaon)….

- Advertisement -

सहयाद्रीच्या कड्या कपाऱ्यात निसर्गाच्या छायेखाली असलेल्या ग्रामपंचायत मांजरगाव येथील मांजरगाव गावठा, बारवाचीवाडी, गोडसेवाडीतील स्थानिक आदिवासी महिलांची पिण्याच्या पाण्याची भटकंती अखेर ग्रामपंचायतीच्या अथक प्रयत्नांनी थांबली.

स्वातंत्र्य काळापासून ते आजपर्यंत इगतपुरीच्या (Igatpuri) पूर्व डोंगराळ भागात असलेल्या मांजरगावातील आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भर उन्हातान्हात वणवण करत फिरावे लागत असत.

ज्या ठिकाणी माणसाला रिकामे व्यवस्थित चालणे कठीण जात होते. अशा खडतर ठिकाणाहून येथील महिला तीन तीन हंडे जुडीने डोक्यावर घेत पिण्याच्या पाण्यासाठी (Drinking Water) जीव धोक्यात घालून मैलोनमैल कसरत करत असत.

सप्तशृंगी गडावर अवैध धंद्यांना ऊत; पोलिसांचा वचक नाही

एकीकडे माणसांनाच प्यायला पाणी (Water) नसल्याने दुसरीकडे मुक्या जनावरांचादेखील पाणी प्रश्न ऐरणीवर होता. स्वातंत्र्य काळापासून ते आजपर्यंत पिढ्यानपिढ्या रूढी परंपरेनुसार पिण्याच्या पाण्यासाठीची संघर्षमय परिस्थिती अशीच चालू असल्याने ही परिस्थिती केव्हा थांबणार? कोण ही परिस्थिती बदलविणार? असा प्रश्न ग्रामपंचायतसमोर होता.

महिलांच्या पिण्याच्या पाण्याचा संघर्षमय प्रश्न ग्रामपंचायत सरपंच लताबाई धोंगडे, उपसरपंच अशोक गभाले, ग्रामविकास अधिकारी आनंदसिंग पाटील व ग्रामपंचायत आजी माजी सरपंच, उपसरपंच सदस्य गावातील सुशिक्षित युवकांना बघवत नव्हता. ग्रामसभा म्हटली की फक्त पाणी प्रश्नावर चर्चा होत असत.

Photo, Video : दोन वर्षानंतर ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज

ग्रामविकास अधिकारी आनंदसिंग पाटील (Anandsingh Patil) यांच्या माध्यमातून सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पाठपुरावा करत जिल्हा परिषदच्या राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पन्नास लक्ष निधी उपलब्ध केला.

याला तात्काळ मंजुरी मिळाली व जि प कडून ४८ लाखांचे टेंडर मंजूर करण्यात आले. यामध्ये गावासाठी एक उंच पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, एक विहीर,व पाईपलाईन जि प स्तरावरून पूर्ण करण्यात आले.

विहिरीला भरपूर पाणी असल्याने यावरच ग्रामपंचायत थांबली नाही तर ग्रामपंचायतने पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून गावातील पाईपलाईनपासून जवळपास १२६ कुटुंबांना थेट घरपोच नळ कनेक्शन देण्यात आले. कायमस्वरूपी महिलांच्या डोक्यावरील हंडा ग्रामपंचायत प्रशासनाने कायमचा उतरविला.गावातील ग्रामस्थांसह मुक्या प्राण्यांचा गुरा वासरांचा पाणी प्रश्न देखील सोडविला.

…जेव्हा डॉ. भारती पवार गौराई घटाची पूजा करतात

गावात ठिकठिकाणी पंचवीस तीस घरे मिळून पाच हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यादेखील उपलब्ध करण्यात आल्या व त्यांना देखील नळ सुविधा करण्यात आली. यामुळे धार्मिक, लग्न समारंभासाठी ग्रामस्थांना टँकरच्या साहाय्याने आणावे लागणारे पाणी आता आणावे लागत नाही.

या कामावरच ग्रामविकास अधिकारी पाटील व ग्रामपंचायत थांबली नाही तर गावातील स्मशानभूमी रोडलगत असलेले जुने तळे याचा गाळ उपसा करण्यासाठी व लिकेज काढण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाला पत्रव्यवहार करून हे काम आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या माध्यमातून मंजूर पण केले आहे.

या तळ्याचे काम पूर्ण होताच तर पुढील पन्नास वर्षांचा गावचा पाणी प्रश्न कायमचा सुटेल असे ग्रामविकास अधिकारी पाटील म्हणतात. आणखी गावापासून तीन चार किलो मीटर अंतरावर शेतात राहणाऱ्या शेतकरी बांधवांना मध्यभागी पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन सुविधा देण्याचा वसादेखील ग्रामपंचायतने घेतला आहे.

अक्षय्य तृतीयेचे महत्व काय? जाणून घ्या सविस्तर

या सर्व कामांसाठी गट विकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, विस्तार अधिकारी संजय पवार, ज्ञानेश्वर कराळे, पृथ्वीराज परदेशी, सरपंच लताबाई धोंगडे,उपसरपंच अशोक गभाले, सर्व ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामविकास अधिकारी आनंदसिंग पाटील यांच्यासह ग्रामस्थांचे योगदान लाभले आहे.

दरम्यान गावातील पाणी प्रश्न ग्रामपंचायतीने सोडविल्याने गावातील महिलांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. दुर्गम डोंगराळ भागात डोंगर उतारावर असलेल्या मांजरगाव चा पाणी प्रश्न ग्रामपंचायतने कायमचा सोडविल्याने परिस्थितीवर मात करत यश मिळवता येते हा वेगळा आदर्श कडक उन्हाळयात भीषण पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना घालून दिला आहे.

एकीकडे उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढते आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करत जीवघेणा संघर्ष करणाऱ्या व तीव्र पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या दुष्काळजन्य भागातील महिलांसमोर मांजरगाव एक वेगळा आदर्श ठरत आहे.

बातमी आपोआप रंगते…; ‘तमाशा लाईव्ह’चा टिझर पाहिलात का?

गावातील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठीची भटकंती पाहवत नव्हती. यासाठी जिपकडून राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत गावचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला. पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून ग्रामस्थांना घरपोच पाईपलाईन करत नळ कनेक्शन दिले. गावात जागोजागी पाच हजार लिटर क्षमतेच्या टाक्या व नळ उपलब्ध केले. गावातील तळ्याचा गाळ उपसा, लिकेजसचे काम हाती घेतले आहे हे काम मार्गी लागले तर गावचा पन्नास वर्षांचा पाणी प्रश्न मार्गी लागेल.

आनंदसिंग भीमसिंग पाटील (ग्रामविकास अधिकारी मांजरगाव)

गावचा मुख्य पिण्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न केले.पाणी प्रश्न मार्गी लागल्याने व ग्रामस्थांना घरपोहच नळाने पाणी दिल्याने समाधान वाटते आहे.लवकरच लघु पाट बंधारे विभागा मार्फत तळ्याचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे.

अशोक गभाले, उपसरपंच मांजरगाव

वर्षनुवर्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायतने सोडविला व गावकऱ्यांना थेट घरपोच नळाने पाणी दिल्याने समाधान व्यक्त होत आहे. आम्हा महिला बघिणींच्या डोक्यावरील हंडा ग्रामपंचायतीने कायमचा उतरवला व भर उन्हातान्हातील पाण्यासाठीची भटकंती थांबली याचा मला मनापासून आनंद वाटतो आहे.

अंजना गभाले, ग्रामस्थ मांजरगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या