Friday, May 3, 2024
HomeनाशिकVideo : नाशिकच्या शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीतून साकारली आधुनिक रेशीम शेती

Video : नाशिकच्या शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीतून साकारली आधुनिक रेशीम शेती

बेलगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे

पारंपारिक शेतीतून मिळणारे उत्पादन यासाठी लागणारा खर्च आणि मिळणारे बाजारभाव हे समीकरण तोट्याचे झाले आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीची सुपीकता अन जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. जमिनीचा कस हा चिंतेचा विषय असून, सेंद्रिय शेतीतून कमी श्रमात देेखिल कोणत्याही हंगामात आधुनिक आंतरराष्ट्रीय रेशीम शेतीतून नवीन रोजगार मिळू शकतो हे इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगरचे शेतकरी सखाहरी (नाना) जाधव यांनी दाखवून दिले आहे…..(igatpuri taluka krishnanagar farmer experimental farming)

- Advertisement -

त्यांच्या अनोख्या प्रयोगामुळे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्यांनी ड्रीपच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने दीड एकर शेतीत रेशीम लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. पिकवलेला रेशीमचा पाला अथवा तुती हा अळ्यांचे खाद्य असून, त्यांनी यासाठी वीस बाय पन्नासचे शेड उभे केले आहे. साधारण तीस दिवसात अळ्या तयार होतात. त्यांची रेशीम जालना येथे विक्रीसाठी जात आहे. (silk cultivation reshim farming success story)

तुती लागवडीचे सहा महिन्यात पहिले पीक येते. रेशीमच्या अळ्यांना बाजारात 500 ते सहाशे रुपये किलो प्रमाणे बाजारभाव मिळतो.दरमहिन्याला साधारण एक लाख 80 हजार उत्पन्न त्यांना मिळत आहे. रेशीम पीक प्रयोगामुळे या वर्षी रेशीमला चांगला भाव असल्याने वर्षाला ८ ते९ लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळाले.

काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आदर्श शेतकरी पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा रेशीम संचानालयतर्फे रेशीम श्री पुरस्कार देखील नाना जाधव यांना मिळाला आहे. (silk cultivation reshim farming government award)

नवीन प्रयोगात त्यांची पत्नी तुळसाबाई, वडील, मुले देखील मदत करतात.त्यांचा प्रयोग पाहून तालुक्यातील शेतकरी देखील सरसावले आहेत. विशेष म्हणजे या शेतीत कीटकनाशके फवरण्याची देखील गरज भासत नाही.

तुती लागवडीसाठी जीवामृत, शेणखत ,गांडूळ खत या सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादन मिळाले. जाधव हे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन देण्याचे महत्वपूर्ण काम करीत असतात. बेलगाव कुऱ्हेचे आदर्श शिक्षक विष्णू बोराडे यांनी रेशीम शेती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले आहे.

शेतीचे मार्गदर्शन महाराष्ट्र रेशीम संचालनालय चे सह संचालक दिलीप हाके, महेंद्र ढवळे, जिल्हा रेशीम तांत्रिक आधीकारी सारंग सोरते हे वेळोवेळी मार्गदर्शन करतात. रेशीम उद्योगा मुळे पैसे मिळाले व मानसन्मान देखील कुटुंबातील व्यक्ती आनंदाने व्यवसाय करतात. मोठा मुलगा राहुल याने कोल्हापूर विधापीठात सेरी कल्चर डिप्लोमा केला त्याचा ही फायदा रेशीम उद्योग करताना होत आहे.

शासनाच्या नियोजन आणि तज्ञांचे योग्य मार्गर्शन घेत सहा वर्षांपासून रेशीम शेती करीत आहे. या शेतीला सर्वार्दीक महत्व दिल्यास शेती यशस्वी होऊ शकते. उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा असला तरी रेशीम शेती जगून राहते. भरघोस उत्पन्न मिळत आहे.

सखाहरी उर्फ नाना जाधव, शेतकरी कृष्ण नगर

- Advertisment -

ताज्या बातम्या