Sunday, May 5, 2024
Homeनाशिकमहिला आरक्षण सोडतीचे सोशल मीडियावर प्रक्षेपण

महिला आरक्षण सोडतीचे सोशल मीडियावर प्रक्षेपण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीतील ( NMC Elections ) महिला आरक्षणाची सोडत ( Womens Reservation Draw )येत्या 31 मे रोजी होणार आहे. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

- Advertisement -

महापालिकेचे प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी नुकतीच दादासाहेब गायकवाड सभागृहाची पाहणी करून सूचना केल्या. दरम्यान, ही सोडत ऑनलाईन पद्धतीने घरी बसूनसुद्धा पाहता येणार असल्याची सोय महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

महिला सोडत प्रक्रियेचे सोशल मीडियावर प्रक्षेपण होणार आहे. महापालिका प्रशासनाने सोडतीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाची पाहणी केली. या पाहणीत आढळून आलेल्या त्रुटी लक्षात घेऊन तेथील सुविधेबाबत निर्देश देण्यात आले. सभागृह करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद होते. त्यामुळे या ठिकाणी काही समस्या आढळून आल्या. यावेळी साफसफाई मोहीम राबवण्यात आली. 31 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्या देखरेखीखाली महिला आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू होईल. चिठ्ठी पद्धतीने सोडत काढण्यात येणार असल्यामुळे सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यासाठी शिक्षण विभागावर विद्यार्थ्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

67 जागा महिलांना राखीव

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास टक्के महिला आरक्षण याप्रमाणे नाशिक महापालिकेत 67 जागा महिलांच्या ताब्यात जाणार असून 43 प्रभागांत प्रत्येकी एक आणि एका प्रभागात दोन याप्रमाणे 45 महिलांचे आरक्षण असेल तर उर्वरित 22 जागांच्या आरक्षाणाची सोडत पद्धतीने काढण्यात येणार आहे. यामध्ये एससी, एसटी आणि सर्वसाधारण जागांचा समावेश असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या