Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात कंपनी व्यवस्थापकाचा खून; भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ

नाशकात कंपनी व्यवस्थापकाचा खून; भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अंबड औद्योगिक वसाहतीतील (Ambad MIDC) एका कंपनीत काम व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या एका व्यक्तीचा तलवारीने वार करून खून करण्यात आल्याची घटना आज (दि ०७) घडली. भरदिवसा घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे….(Company manager murder at ambad midc area)

- Advertisement -

नंदकुमार निवृत्ती आहेर (वय ५०, रा. महात्मा नगर) असे खून झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. ते अंबड एमआयडीसीतील जेपी स्वीटजवळ असलेल्या आहेर इंजिनियरिंग कंपनीत कार्यरत होते.

आज (दि ०७) सकाळी दहा वाजेच्या सुमारास कंपनीच्या बाहेरच वाहनातून उतरल्यानंतर त्यांच्यावर काही संशयितांनी तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला.

या घटनेत रक्तबंबाळ झालेल्या आहेर यांचा जागीच मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या प्रकारामुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या