Thursday, May 2, 2024
Homeनगरविद्यार्थ्यांना 15 जूनपासून शाळा शिक्षकांना 13 पासून सक्तीची उपस्थिती

विद्यार्थ्यांना 15 जूनपासून शाळा शिक्षकांना 13 पासून सक्तीची उपस्थिती

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे 2022-23 शैक्षणिक वर्ष सुरु यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे 13 जूनला शाळा सुरू होतील तथापि विद्यार्थ्यांनी 15 जूनपासून उपस्थितीत रहावे, असे निर्देश शिक्षण आयुक्त यांनी दिले आहेत.

- Advertisement -

यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यात आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये सुरू करण्याबाबत निर्देश दिले होते. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात 13 जून व विदर्भात दि.23 जून 2022 रोजी शाळा सुरु करण्यात येणार होत्या. विदर्भातील शाळा चौथा सोमवार दि. 27 जून 2012 रोजी होतील अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत.

13 जून 2022 रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर उपस्थिती राहून शाळची स्वच्छता करणे, शाळेचे शिक्षकेतर कर्मचाऱी, आरोग्यविषयक बाबी अनुषंगाने उद्बोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे. 15 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना शाळेत येण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच विदर्भातील दि. 24 जून 2022 ते 25 जून 2022 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक शिक्षक कर्मचार्‍यांचे आरोग्यविषयक उद्बोधन करणे याचे आयोजन करून दि. 27 जून 2022 पासून प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शासनाकडून आरोग्य विभागाकडून स्थानिक आपत्ती वेळोवेळी निर्देश/सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सूचनेनुसार काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी. मुलांचे/पालकचे कोविड 19 प्रभावाच्या अनुषंगाने प्रबोधन, उद्बोधन करण्यात यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या