Friday, May 3, 2024
Homeनगरनुपूर शर्माला अटक करून कठोर कारवाई करावी

नुपूर शर्माला अटक करून कठोर कारवाई करावी

राहाता |वार्ताहर| Rahata

नुपूर शर्माने मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल राहाता शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी शुक्रवारी या घटनेच्या निषेधार्थ पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना निवेदन दिले. समाजाच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचल्याबद्दल नुपुर शर्माला अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली.

- Advertisement -

शुक्रवारी नमाज पठण झाल्यानंतर शहरातील मुस्लिम बांधवांनी विरभद्र मंदिरासमोर एकत्र येऊन पोलीस स्टेशनला या घटनेच्या निषेध करत मोर्चा काढून इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधान करून संपूर्ण देशातील व विदेशातील मुस्लिम समाजाचे धार्मिक भावना दुखावून भारत देशाचे धार्मिक व सामाजिक वातावरण गढूळ करून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केल्याबद्दल अशा समाजकंटक प्रवृत्तीच्या नुपूर शर्मावर गुन्हा दाखल करुन लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी मौलाना रफिक, मौलाना सोहेल, मौलाना आरिफ, साई निर्माण ग्रुपचे मुन्ना शहा, काळुभाई ट्रान्सपोर्ट, इक्बाल शेख, गुलशेर शेख, मुश्ताक शहा, सुलेमान शेख, छोटे फिटर, इरफान शेख, जमील शहा, शफिक टेलर, इसक पठाण, इलियास शहा, अब्दुल सय्यद, मेहमूद सय्यद, इक्बाल मनियार, हुसेन शेख, खिजर शहा, सय्यद कौशिक सय्यद, मुजाईद शहा, अन्वर शेख, शरीफ शेख, रियाज शेख, फरीद शेख, डॉ. नजीर शेख, समीर बेग, राजू सय्यद, अन्वर पठाण, शबान पठाण, खलिल शहा, मौलाना अल्ताफ, राजूभाई पठाण, मुजफ्फर शेख, अस्ताक बेग, आसिफ खाटीक, रहीम खाटीक, सादिक शहा, बिलाल इनामदार, मोसिम इनामदार, मुन्ना तांबोळी, फारुक शेख, अस्ताक तांबोळी यांच्यासह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या