Sunday, May 5, 2024
Homeनगरचुलत्या-पुतण्यात वाद लावण्याचे षडयंत्र

चुलत्या-पुतण्यात वाद लावण्याचे षडयंत्र

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांचे बंधू कै. सदाशिवराव पाचपुते हे त्यांचे कवच कुंडले होते. दोन्ही बंधू मधील सलोख्याचे संबंध हे राज्याला माहिती असतांना वडील सदाशिवराव पाचपुते यांच्या निधनानंतर आता चुलते पुतण्यामध्ये वाद लावण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे आरोप केला.

- Advertisement -

कै. सदाशिवराव पाचपुते यांचे चिरंजीव साजन शुगर कारखाना चेअरमन साजन पाचपुते यांनी काष्टी येथील निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पाचपुते म्हणाले, आ. बबनराव पाचपुते आणि माझ्यात वाद नाहीत. कौटुंबिक मतभेद असू शकतात, पण चुलते-पुतणेच्या नात्यात वाद लावण्याचे काम काहीजण करत आहेत. अण्णांच्या जाण्याने माझे आयुष्य बदलले, तसेच अनेक कार्यकर्त्यांना आधार राहिला नाही. अण्णांच्या नावाने सामाजिक संस्था तयार करणार असून त्या माध्यमातून 101 मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजन करणार आहोत.

या सामाजिक संस्था माध्यमातून मला राजकारण करायचे नाही. 1 जुलै रोजी या संस्थेची घोषणा करणार आहे. सामान्य जनतेला बरोबर घेणार काम आहे. धर्मादाय हॉस्पिटल उभारणी करणार आहोत. सामाजिक कामातून जनतेमध्ये जायचं आहे. मी भावी आमदार नाही. आजही आम्ही एकच आहोत. आमच्यासाठी तुम्ही रिस्क घेऊ नका आमचे रक्ताचे नाते आहे. आमच्यासाठी तुम्ही वाईट होऊ नका. दादा आणि आमच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत. दोन्ही बाजूने काही चांगल्या वाईट गोष्टी सांगत आहेत, असे यावेळी साजन पाचपुते यांनी सांगितले.

जिल्हा परिषद उमेदवारीसाठी शब्द

यावेळी बोलताना साजन पाचपुते यांनी आ. बबनराव पाचपुते यांनी काष्टी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारीचा शब्द यापूर्वी दिलेला आहे.अण्णा इथे जिल्हा परिषद सदस्य असल्याने माझ्या उमेदवारीवर प्रबळ दावा आहेच आणि आपण सक्षम उमेदवार असल्याने उमेदवारी मिळू शकते, असा विश्वास व्यक्त करत जर उमेदवारी नाही मिळाली तर त्यावेळी निर्णय घेऊ असे ही सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या