मुंबई | Mumbai
एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार (Thackeray government) कोसळण्याच्या मार्गावर आहे. पण याच दरम्यान मंत्रालय () हाऊसफुल्ल झाल्याची माहिती मिळत आहे…
याचे कारण म्हणजे आता सत्तांतर होईल या भीतीने मंत्रालयात फाईलींच्या कामांना वेग आल्याचे समजते. मंत्रालयातील कामांच्या मंजुरीसाठी टेबलांवर फाईल्सचे ढीग पडून असल्याचे दिसून येत आहे.
शिंदे गटात इतके आमदार कसे?; काँग्रेस-राष्ट्रवादीची शंका
शिवसेनेतील पडलेल्या फुटीमुळे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मंत्रीचीही धाकधूक वाढली आहे. त्यामुळे फाईल्स क्लिअर करण्याच्या कामाला गती प्राप्त झाली आहे.
मुख्यमंत्री मंत्रालयाला करणार ‘जय महाराष्ट्र’?; आज सचिवांसोबत बैठक
मंत्री कार्यालयांतदेखील धांदल उडाली आहे. काही विभागात कर्मचारी जादा ड्युटी करून फाईल्स क्लिअर करण्याचे काम करत आहेत. यामुळे प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्याचे दिसून येते.