रांजणगाव देशमुख |वार्ताहर|Rajangav Deshmukh
कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोर्हाळे येथील उमरावती सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे देवराम विठ्ठलराव गवळी तर उपाध्यक्षपदी साहेबराव काशिनाथ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.
गवळी यांच्या नावाची सूचना संस्थापक अरुण येवले यांनी तर चांगदेव कोल्हे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी पुंडलिक गवळी यांनी सूचना आणली तर त्यास देवराम गवळी यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एन. राहणे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचीत अध्यक्ष उपाध्यक्षांचा, इयत्ता दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा, तसेच जिल्हा बँक पातळीवर शंभर टक्के वसुली केल्याबद्दल सचिव अशोक घेर तसेच हिंगणवेढे, शिलेदारवाडी सोसायटी सचिव व बँक अधिकार्यांचा सत्कार करण्यात आला, देर्डे कोर्हाळे गावात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब होन, ज्ञानेश्वर देशमुख, विशाल डूबे, पुंडलीक गवळी, सोमनाथ गायकवाड, निवृत्ती विघे, विजया पवार, रेखा कोल्हे, चांगदेव कोल्हे, दिगंबर बैरागी, शैलेश डूबे, राजेश डूबे, भाऊसाहेब डूबे, चांगदेव शिंदे, प्रशांत शिलेदार, संजय शिलेदार, कैलास दवंगे, भाऊसाहेब शिंदे, संदीप डूबे, सुमित चौधरी, वसंत पवार, राजेंद्र पेकळे, राजेंद्र गवळी यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी संचालक पदाधिकारी उपस्थित होते. सचिव अशोक घेर यांनी आभार मानले.