Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedम्हाडातर्फे ९८४ सदनिका वितरणासाठी सोडत जाहीर

म्हाडातर्फे ९८४ सदनिका वितरणासाठी सोडत जाहीर

औरंगाबाद – aurangabad

खासगी घरे विकली जात नाहीत अशी परिस्थिती असताना (MHADA) म्हाडाच्या औरंगाबाद मंडळाच्या एक हजार २०४ सदनिका (Flat) आणि भूखंडांकरिता ११ हजार अर्जदारांचा मिळालेला प्रतिसाद म्हणजे नागरिकांची म्हाडाच्या कार्यप्रणालीवरील विश्वासार्हता सिद्ध करते याचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन राज्याचे (Minister of Housing) गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड (Dr. Jitendra Awhad) यांनी केले.

- Advertisement -

आता पार्सल दारू घेऊन ढाब्यावर बसणे पडेल महागात

म्हाडाच्या औरंगाबाद गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांतील विविध गृहप्रकल्पांतर्गत ९८४ निवासी सदनिका व २२० भूखंडांच्या वितरणाकरिता संगणकीय सोडत काढण्याचा कार्यक्रम गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे येथील नाद या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, औरंगाबाद मंडळाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे, म्हाडाचे वित्त नियंत्रक दिग्विजय चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा जायभाये-धुळे, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके आदी उपस्थित होते. तर औरंगाबाद येथे मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधनीतील या सोडतीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, नोडल अधिकारी तथा कार्यकारी अभियंता वैभव केदारे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयकुमार नामेवार, इस्टेट व्यवस्थापक श्रीमती एस.एच. बहुरे आदींसह म्हाडाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिरती होती.

सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची ऑनलाईन संगणकीय सोडतीला गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते संगणकावर क्लिक करून सुरवात करण्यात आली. सोडत प्रक्रियेत सहभागी अर्जदारांकरिता मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सोडतीचे वेबकास्ट प्रणालीद्वारे थेट प्रक्षेपणाची देखील सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. सोडत कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सभापती संजय केणेकर यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या