मुंबई | Mumbai
मुंबईला (Mumbai) पुन्हा उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) करण्याची धमकी पोलीस कंट्रोल रुमला (Police Control Room) पाकिस्तानातूनमधून (Pakistan) आल्याची माहिती मिळत आहे….
- Advertisement -
या हल्ल्यात भारतात असलेल्या 6 जणांची मदत घेणार असल्याचेदेखील मेसेज म्हटले आहे. त्यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. मुंबईत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मिळाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
नुकतेच रायगड जिल्ह्यात (Raighad District) शस्त्रांनी भरलेली बोट सापडल्यानंतर आता मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी आल्याने मुंबईसह देशाचे टेन्शन वाढले.