Friday, May 3, 2024
Homeनगरपावसाअभावी सोयाबीन पीक धोक्यात; शेतकरी हवालदिल

पावसाअभावी सोयाबीन पीक धोक्यात; शेतकरी हवालदिल

पिंपरी निर्मळ | वार्ताहर

राहाता तालुक्यातील निळवंडेच्या जिरायत भागातील पिंपरी निर्मळ परिसरात पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके संकटात सापडली आहे.

- Advertisement -

खरिपाची सोयाबीन, मका, कपाशी, भाजीपाला आदी पिके संकटात सापडली आहे. दहा पंधरा दिवसापासून या परिसरात पावसाने ओढ दिली आहे. पिकांचे नुकसान झाल्याने पिक विमा कंपन्यांनी पंचनामे करावेत अशी मागणी शेतकर्‍यांमधुन होत आहे.

गणेश परीसरातील निळवंडेच्या जिरायत टापुत शेतकऱ्यांना सालाबाद प्रमाणे याही वर्षी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सुरवातील बऱ्यापैकी झालेल्या पावसाने पिंपरी निर्मळ परीसरात खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या. मात्र ऐन फुलोऱ्यातच पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या पिकाचें मोठे नुकसान झाले आहे.

पाटपाण्याची सोय नसल्याने एका पाण्यावर आलेली हलक्या व मुरमाड जमीनीवरील पिके पाण्याअभावी भुईसपाट झाले असुन शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या