Thursday, May 2, 2024
Homeनगरसदोष पिंजर्‍यामुळे अडकलेला बिबट्या पसार

सदोष पिंजर्‍यामुळे अडकलेला बिबट्या पसार

माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav

वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी केल्यानंतर खात्याकडून पिंजरा मिळाला. परंतु पिंजर्‍याचे बुडाचे प्लायवूड फळया सदोष असल्याने पिंजर्‍यात अडकलेला बिबट्या माती उकरून पसार झाल्याची घटना माळवाडगाव (ता. श्रीरामपूर) शिवारात घडली.

- Advertisement -

याबाबत हुरूळे वस्ती परिसरातील शेतकर्‍यांकडून मिळालेली माहिती अशी की, अनेकदा तक्रारीचा पाठपुरावा केल्यानंतर अखेर वन विभागाने पिंजरा देण्याचे कबूल केले. आम्ही आमच्या स्वखर्चाने खंडाळा शिवारातून पिंजरा आणला. पिंजर्‍यात ठेवण्यासाठी बोकड अथवा बकरीसाठी वर्गणी गोळा करण्यापेक्षा, शेजारच्या पोल्ट्री फार्म मधून सुदामराव आसने यांनी पिंजर्‍यात ठेवण्यासाठी कोंबड्या दिल्या. वनसंरक्षक कर्मचारी यांच्या मदतीने सांगितलेल्या ठिकाणी पिंजरा ठेवून कोंबड्याही ठेवल्या. आज रात्री बिबट्या नक्की अडकणार या आशेने शेतकरी घरी गेले.

दुसर्‍या दिवशी सकाळी पिंजर्‍या जवळ जाऊन पाहतात तर पिंजर्‍यात अडकलेला बिबट्या प्लाऊडच्या कुजक्या फळ्या तोडून जमिनीवर माती उकरून सुर्योदयापूर्वी पसार झाल्याचे निदर्शनास आल. त्यामुळे शेतकर्‍यांत पुन्हा भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा सदोष पिंजरा ज्या ठिकाणाहून आणला त्याठिकाणी देखील बिबट्या पिंजर्‍यातून पसार झाल्याचे समजते. नादुरूस्त पिंजरे दुरूस्त करण्याऐवजी शेतकर्‍यांचे माथी मारण्याचा खटाटोप वनविभाग अधिकारी शेतकर्‍यांचे समाधानासाठी करतात की काय?असा सवाल संतप्त शेतकर्‍यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या