Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील मोठा प्रकल्प पुन्हा गुजरातमध्ये; आदित्य ठाकरेंचा आरोप

राज्यातील मोठा प्रकल्प पुन्हा गुजरातमध्ये; आदित्य ठाकरेंचा आरोप

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडी सरकारने (MahaVikas Aghadi Government) फॉक्सकॉन प्रकल्पाच्या (Foxconn Project) माध्यमातून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक (investment) आणली होती. मात्र राज्यातील सरकार बदलल्यानंतर फॉक्सकॉन प्रकल्पाचे श्रेय देखील शिंदे-फडणवीसांच्या सरकारने घेतले होते. पण हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर घालविण्याचा काही जणांचा उद्देश होता, अशी टीका आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटावर (BJP and Shinde Group) केली आहे…

- Advertisement -

गेल्या काही वर्षात महाराष्ट्र (Maharashtra) आणि मुंबईचे (Mumbai) आर्थिक महत्त्व कमी करण्यासाठी राज्यातील महत्वाचे प्रकल्प आणि कार्यालये गुजरातला हलविल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. तसेच सरकारी कार्यालये जाणीवपूर्वक मुंबईतून बाहेर नेण्यात येत असल्याचे शिवसेनेने वेळोवेळी म्हटले आहे. त्यानंतर आता ‘फॉक्सकॉन’ प्रकल्पाच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले आहेत.

तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून १ लाख ५४ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार होती. पण हा प्रकल्प गुजरातला (Gujarat) गेल्याने महाराष्ट्र पुन्हा एकदा मोठ्या प्रकल्पाला मुकला आहे. याशिवाय ज्या प्रकल्पासाठी आम्ही सरकारमध्ये असताना खूप प्रयत्न केले, तो फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जात असून त्यासाठी काही मंडळींनी प्रयत्न केला, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या