Friday, May 3, 2024
HomeजळगावBreaking # गतीमंद मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधामास मरेपर्यंत जन्मठेप

Breaking # गतीमंद मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधामास मरेपर्यंत जन्मठेप

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

भिक मागणार्‍या (beggars) गतीमंद दहावर्षीय अल्पवयीन (retarded minor girl) मुलीला खाऊचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार (torture) करणार्‍या सौरभ वासुदेव खर्डीकर (Saurabh Vasudev Khardikar)(वय-26, रा. राधाकृष्णनगर) या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेपेची (Life imprisonment till death) शिक्षा सुनावली. हा निकाल विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरीक्त सत्र न्यायाधीश (Special POCSO Judge and Additional Sessions Judge) बी. एस. महाजन यांच्या न्यायालयाने दिला.

- Advertisement -

शहरातील राधाकृष्ण नगरातील सौरभ खर्डीकर याने भिक मागणार्‍या गतीमंद दहा वर्षीय चिमुकलीला खाऊचे अमिष दाखवून तिला गोलाणी मार्केटमधील तिसर्‍या मजल्यावरील शौचालयात घेवून गेला. याठिकाणी तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दि. 10 जुलै 2020 मध्ये घडली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा खटला विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरीक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयासमोर चालला. या खटल्यात तपासधिकारी गणेश बुवा व सहा. पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. त्यांना पैरवी अधिकारी किरण पाटील व विजय पाटील यांनी सहकार्य केले. आरोपीतर्फे अ‍ॅड. नितीन नाईक यांनी काम पाहिले.

16 जणांच्या साक्षीसह सीसीटीव्हीचा पुरावा ठरला महत्वपुर्ण

न्यायालयाने सरकारपक्षातर्फे एकूण 16 साक्षीदार तपासले. यामध्ये पिडीत मुलगी, आरोपीचे रेखाचित्र काढणारे चित्रकार व डॉक्टर यांच्या साक्षीसह घटनास्थळावरुन गोळा करण्यात आलेला सीसीटीव्हीचा पुरावा या गोष्टी महत्वपुर्ण ठरल्या.

या कलामांनुसार ठोठावली शिक्षा

न्यायालयासमोर सादर केलेल्या पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी सौरभ खर्डीकर याला भादवि कलम 363, 376 (2)(जे)(एल), 376 (एबी) तसेच बाल लैगिंग अत्याचार प्र. अधिनियम 2012 चे कलम 6 व 10 तसेच अ.जा.अ जमाती कायदा कलम 3(2)(व्हीए) खाली दोषी धरुन आरोपीला 5 हजार दंड व न भरल्यास 1 महिना सक्त मजूरी, तसेच अ.जा. अ. जमाती कायदा कलम 3(2)(व्हीए) खाली 20 वर्षे सश्रम कारावास व 20 हजार रुपये दंड न भरल्यास 4 महिने सक्त मजूरीची शिक्षा ठोठावली.

हे कृत्य समाजाला काळीमा फासणारे

पिडीत गतीमंद भिक मागणार्‍या मुलीच्या गरीबीचा व लाचारीचा गैरफायदा घेवून आरोपी सौरभ याने केलेले कृत्य हे समाजात व माणुसकीला काळीमा फासणारे आहे. त्यामुळे या नराधामाला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशी मागणी अति. शासकीय अभियोक्ता चारुलता बोरसे यांनी न्यायालयासमोर केली होती. त्यांनी केलेल्या प्रभावी युक्तीवादामुळे न्यालयाने सौरभ खर्डीकरला दोषी धरले.

- Advertisment -

ताज्या बातम्या