Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याखोके खोके बोलतात, वेळ आली की बोलेल...

खोके खोके बोलतात, वेळ आली की बोलेल…

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

अडीच वर्षांनी गटप्रमुखांची आठवण आली, तेव्हा वर्षा-मातोश्रीवर प्रवेश नव्हता. आम्ही क्रांती केली म्हणून गटप्रमुखांना चांगले दिवस आले आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले. “खोके खोके बोलतात, वेळ आली की बोलीन, माझ्यापेक्षा जास्त हिशोब कुणाकडे नसणार हे सगळं महाराष्ट्रात बोलेल , असा टीकेचा बाण दिल्लीतून मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरेंवर सोडला .

- Advertisement -

मुंबईत उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर शाब्दिक तोफ डागली होती त्यास एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युतर दिले .

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले , शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोकर समजलं किंवा तशी वागणूक दिली तर ती खपवून घेतली जाणार नाही.

आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना पुढे घेवून जाण्याचं काम करतोय. तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोकर समजणार तर ते सहन केलं जाणार नाही. बाळासाहेब ठाकरेंसोबत हजारो कार्यकर्ते आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी रक्त आणि घाम गाळून शिवसेना उभा केली. त्यांनी पक्षासाठी दिवसरात्र मेहनत करत बलिदान दिलं आहे. त्यामुळे तुम्हाला शिवसेना आमची जहागीर आहे, असं सांगण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत. त्यामुळे आम्हाला चांगला पाठिंबा मिळत आहे.

आम्हाला मिंधे गट म्हणाले, आम्ही मिंधे नाही बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत. सरकार बनवण्यासाठी मिंधेपणा कोणी केला? सरकार बनवण्यासाठी काँग्रस-राष्ट्रवादीसोबत कोण गेलं? हे महाराष्ट्र-देश बघतोय. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना आसमान दाखवयाची वेळ येणार नाही, तीन महिन्यांपूर्वी आसमान दाखवलं आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

.

- Advertisment -

ताज्या बातम्या