Friday, May 3, 2024
Homeनगर‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील गीत जयेश खरेच्या आवाजात

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील गीत जयेश खरेच्या आवाजात

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

आपल्या आवाजाने नेटकर्‍यांना भुरळ घालणार्‍या नेवासा तालुक्यातील (Newasa) करजगावच्या (Karajgav) छत्रपती शिवाजी विद्यालयात सहावीत शिकत असलेल्या जयेश खरे (Jayesh Khare) या विद्यार्थ्याच्या गायनाने प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल (Ajay Atul) व दिग्दर्शक केदार शिंदे (Director Kedar Shinde) हे देखील प्रभावीत झाले असून त्यांनी त्यांच्या आगामी शाहीर साबळे (Shaheer Sable) यांचा जीवनपट असलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer Film) या चित्रपटासाठी जयेश शिंदे (Jayesh Shinde) याच्या आवाजात एका गाण्याचे रेकॉर्डींग केले आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, नेवासा (Newasa) तालुक्यातील करजगावच्या (Karajgav) छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत असलेल्या जयेश खरे या विद्यार्थ्याने वर्गात गायलेल्या चंद्रमुखी चित्रपटातील ‘चंद्रा’ हे गाणे शिक्षक कृष्णा राठोड यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केल्यानंतर सर्वांनाच हा आवाज पसंत पडला. लाखो लाईक्स मिळाले.

प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल (Famous Music Composer Ajay Atul) तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Director Kedar Shinde) यांनाही त्याचा आवाज भावला. त्यांनी त्याला मुंबईत बोलावून घेवून त्यांच्या आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटासाठी त्याच्या आवाजात एका गाण्याचे रेकॉर्डींग करुन घेतले. ग्रामीण भागातील एका हिर्‍याची ओळख पटली. जयेशला संधी मिळाल्याने त्याचे कौतुक होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या