Sunday, May 5, 2024
Homeनगरएकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शेतकर्‍यांची मागणी

एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शेतकर्‍यांची मागणी

उंबरे |वार्ताहर| Umbare

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची शासनाने निर्धारित केलेली रक्कम वाढवून एकरी 50 हजार रुपये करावी, या मागणीसाठी ब्राम्हणी येथील शेतकर्‍यांनी राहुरी तहसिलदार यांना निवेदन दिले आहे.

- Advertisement -

निवेदनात म्हटले, पावसामुळे नुकसान झाल्यामुळे तलाठ्यांच्या मार्फत सर्व पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. शासनाने पीक नुकसानीची रक्कम एकरी 50 हजार रुपये देण्यात यावी. पंचनाम्यामध्ये घास, ऊस तसेच चारा या पिकांचे पंचनामे केलेले नाही. या पिकांचाही पंचनामा करण्यात यावा. पंचनामा करताना शेतकर्‍यांना अनेक प्रकारच्या अडचणी आल्या आहेत, त्यामध्ये फोटो, 7/12 व 8 अ उतारा व इतर कागदपत्रे गोळा करताना शेतकर्‍यांना अत्यंत त्रास व आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले. सर्व प्रकारचे रेकॉर्ड तलाठी कार्यालयात असल्याने 119 शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

निवेदनावर भारत तारडे, सुरेश भिसे, जालिंदर वने, प्रतिक साठे, संजय राजदेव, पांडुरंग हापसे, भारत लक्ष्मण तारडे, संजय तारडे, शिवाजी हापसे, गोरक्षनाथ भिसे, संकेत हापसे, खलील इनामदार, अमोल साठे, सागर तेलोरे, गणेश तारडे, बाबासाहेब राजदेव,आदिनाथ घोडके, दत्तात्रय तारडे,फकिरा वाकडे, अमोल वाघ आदी शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या