Wednesday, May 8, 2024
Homeनगरठेकेदाराच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

ठेकेदाराच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ठेकेदार व त्यांच्या मित्राला बिअरच्या बाटलीने मारहाण करून जखमी करण्यात आले. बुधवारी दुपारी सिध्दीबाग रोड, तोफखाना येथे ही घटना घडली. मारहाणीत जखमी झालेले ठेकेदार वितेश राजू घोडके (वय 30 रा. दातरंगे मळा, नालेगाव) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

दिलेल्या फिर्यादीवरून गणेश पवार (रा. लिंकरोड, पवार वस्ती, नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी ठेकेदार घोडके व त्यांचे मित्र अब्दुल गणीबाबा पठाण हे दुचाकीवरून सिध्दीबाग रोडने जात असताना जंगुबाई तालीमसमोर गणेश पवार याने त्यांना थांबण्यास सांगितले. गणेशने घोडके यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तुम्हाला पाहून घेईल, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच काचेची बिअर बाटली घोडके यांच्या डोक्यात फोडून त्यांना जखमी केले आहे. भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेले घोडके यांचे मित्र पठाण यांना देखील मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादी म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या