Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामनपा विभागीय कार्यालयातील दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

मनपा विभागीय कार्यालयातील दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेने नेमून दिलेले काम न करता हजेरी मस्टरवर सही करण्याचे व उशीर झाल्यास खाडे न पकडण्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच मागणाऱ्या स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केल्याची घटना नाशिकरोड विभागीय कार्यालयात घडली.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिकरोड विभागीय कार्यालयातील राजू देवराम निर्भवणे (५५,व्यवसाय: स्वच्छता निरीक्षक, वर्ग 3 ,मनपा विभागीय कार्यालय, नाशिकरोड) व बाळू दशरथ जाधव (५२, व्यवसाय: मुकादम, सफाई कामगार, वर्ग ४, मनपा विभागीय कार्यालय नाशिकरोड ) यांनी तक्रारदाराकडून महापालिकेने नेमून दिलेले काम न करता हजेरी मस्टरवर सही करण्याचे व उशीर झाल्यास खाडे न पकडण्याच्या मोबदल्यात तक्रार यांच्याकडून सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती व तडजोडीअंती पाच हजार रुपयांची मागणी करून त्यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक वाचक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी उपअधीक्षक वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक संदीप घुगे, शरद हेंबाडे, राजेंद्र गीते, एकनाथ बाविस्कर, हवालदार संतोष गांगुर्डे, परशराम जाधव यांच्या पथकाने यशस्वीरित्या राबवली.

- Advertisment -

ताज्या बातम्या