Friday, May 3, 2024
Homeधुळेआठवडभरात 7 जनावरांचा लंपीने मृत्यू

आठवडभरात 7 जनावरांचा लंपीने मृत्यू

शिरपूर Shirpur । प्रतिनिधी

लंपी स्कीन आजाराने (Lumpy skin disease) शिरपूर तालुक्यात (Shirpur Taluk) हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या आठवड्यात अचानक तालुक्यात अनेक गावात जनावरे बाधित (Animals affected) झाली असून 7 जनावरांचा मृत्यू (Death of animals) झाला आहे. त्यामुळे शेतकरी व दुग्ध व्यवसायिक (Farmers and dairymen) चिंतेत (worried) पडले आहेत. शेतकर्‍यांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन पशुधन विभागाने केले. दरम्यान आतापर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तालुक्यातील 47 हजार जनावरांचे लसीकरण केले आहे.

- Advertisement -

याबाबत शिरपूर भाजपाचे शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांचे शिष्टमंडळाने येथील पशु वैद्यकिय अधिकारी बारी यांची भेट घेऊन शासनाकडून सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. यावेळी भाजपा शहर सरचिटणीस रोहित शेटे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, शहर उपाध्यक्ष मुकेश पाटील, शहर चिटणीस राधेश्याम भोई, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गुरव, अमोल पाटील, अनिल बोरसे, भुरा पाटील, गणेश माळी, संजय पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी बारी यांनी सांगितले की, आतापर्यंत तालुक्यात 7 जनावरे दगावले असून 4 जनावरांची 25 हजार रुपये प्रमाणे भरपाईची रक्कम देण्यात आली. जनावरांना लंपी या संसर्गजन्य आजारापासून अनेक दिवसांपासून सुरक्षित ठेवण्यात यश आले होते. मात्र या आठवड्यात अचानक तालुक्यात अनेक गावात जनावरे बाधित झाली असून 7 जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गुरांची खरेदी विक्री करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी मनाई केली आहे. पशुधन विकास अधिकारी उपाययोजनांवर भर देत आहेत. जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली असून शेतकर्‍यांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लसीकरणाचे काम सुरु असल्याचे पशूसंवर्धन विभागप्रमुख बारी यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या