Thursday, May 2, 2024
Homeनाशिकविविध समस्यांबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन

विविध समस्यांबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

गुन्हेगारीला ( Crime ) आळा घालण्यासाठी गोविंदनगर, कर्मयोगीनगर भागात ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यासाठी स्मार्ट सिटीकडे ( Smart City ) शिफारस करावी, ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र द्यावे, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी, रस्ता सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात आदी मागण्या पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे ( Police Commissioner Jayant Naiknavare ) यांच्याकडे करण्यात आल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), सत्कार्य फाउंडेशन आणि ज्येष्ठ नागरीक संघाच्या शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन दिले.

- Advertisement -

प्रभाग ३० मधील गोविंदनगर, कर्मयोगीनगर, जगतापनगर, तिडकेनगर, कालिका पार्क, प्रियंका पार्क, बडदेनगर, जुने सिडको, खोडे मळा, भुजबळ फार्म, कृष्णबन कॉलनी, सद्गुरूनगर, काशिकोनगर, बेळे कॉलनी, बाजीरावनगर, उंटवाडी, सिटी सेंटर मॉल सिग्नल ते गोविंदनगर महामार्ग सर्व्हिस रोड, तिडके चौक ते रुंग्ठा इम्पेरिया इमारत आदी भागात वळणाचे व अरूंद रस्ते, चौक आहेत. सिटी सेंटर मॉल ते गोविंदनगर या मुख्य रस्त्यासह इतर मोठ्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

येथे नेहमी अपघात होत असतात. रोडरोमियो, सोनसाखळी चोर यांच्यासह भरधाव वेगाने जाणारी वाहने यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या भागात घरफोडय़ांचे प्रमाणही वाढले आहे. गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी, गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी येथे सीसीटीव्ही बसविण्यासाठी स्मार्ट सिटीला अहवाल पाठवावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड ,सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांच्या पुढाकाराने करण्यात आली.

पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड ,शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, संध्या छाया ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विठ्ठल देवरे, सखाराम देवरे, आर. आर. जाधव, गोविंदनगर ज्येष्ठ नागरीक संघाचे सचिव ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, अशोक देवरे, नवे नाशिक ज्येष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाणे आदी हजर होते. या भागात आवश्यक तेथे गतिरोधक बसविण्याबाबत महापालिकेला सूचित करावे, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी, तसेच ज्येष्ठ नागरीक संघ व पोलीस यंत्रणा यांच्यात समन्वय राहण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र द्यावे, याबाबतचे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले.

या निवेदनांवर रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, भालचंद्र रत्नपारखी, डॉ. शशीकांत मोरे, बाळासाहेब तिडके, मगन तलवार, मनोज वाणी, दीपक दुट्टे, बाळासाहेब राऊतराय, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, शैलेश महाजन, सुनिता उबाळे, रूपाली मुसळे, वंदना पाटील, तेजस अमृतकर, अशोक पाटील आदींच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या