Sunday, May 5, 2024
Homeनगरमधुकरराव पिचड हे आदिवासी समाजाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून टार्गेट

मधुकरराव पिचड हे आदिवासी समाजाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून टार्गेट

अकोले |प्रतिनिधी| Akole

माजी मंत्री मधुकरराव पिचड हे आदिवासी समाजाचे असल्यामुळेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस लक्ष करीत असल्याची टीका भाजपा अकोले तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांचेसह पिचड समर्थकांनी केली आहे.

- Advertisement -

मधुकरराव पिचड यांचे सोबत पदमसिंह पाटील, मोहिते पाटील यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस सोडली मग या घराण्यावर का बोलत नाहीत, त्यांच्यावर बोलल तर अजित दादांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. मात्र मधुकरराव पिचड हे आदिवासी समाजाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना टार्गेट केले जात आहे. खासदार सुनील तटकरे यांनी पण असेच वक्तव्य केले आहे. असे मत वाकचौरे यांचेसह विविध कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.

शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरात माजी मंत्री खासदार सुनील तटकरे यांनी मधुकरराव पिचड यांच्या विषयी अनुदगार काढले आहे. त्याचा निषेध अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला. खा. तटकरे यांच्या या वक्त्यव्याचा माजीमंत्री पिचड यांच्या समर्थकांनी जाहीर निषेध करीत वैभव पर्व सुरू होत आहे, ही वादळा पूर्वीची शांतता आहे असा सोशल मीडियावर तटकरे यांना इशारा दिला.

भाजपा अल्पसंख्याक आघाडी चे तालुकाध्यक्ष नाजीम शेख यांनी सुनील तटकरे यांना फोन लावून सांगितले की, मधुकरराव पिचड साहेब हे साहेबच आहे. ते संपणार नाही,ते अहमदनगर जिल्ह्याचे जादूगार आहेत असे सुनावले. असे सूनावताच आ.तटकरे यांनी ओके म्हणत फोन कट केला.हा फोन सोशल मीडियावर तुफान व्हायलर होत आहे.

भाजपा एन टि सेलचे उपाध्यक्ष सचिन उगले यांनी आ.तटकरे यांना फोन लावला व पिचड हे नांव घेताच आ.तटकरे यांनी फोन कट केला.ही ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सुनिल तटकरे शिर्डित येऊन बोंबलले पिचड तालुक्याचे नेते झाले मात्र याच सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताच्या व्हिडिओ मध्ये पिचड यांचा फोटो यांनी लावलाय उगाच काहीही स्टंट करायचे.

पिचड समर्थक शंभू नेहे यांनी सोशल मिडिया वर तटकरे यांना सूनवताना सांगितले की, आम्ही अनेक वेळा तटकरे यांना पिचड यांच्या पाया पडताना पाहिले आहे. संतोष सोडनर, संतोष तिकांडे यांनी ही आपल्या पध्दतीने निषेध नोंदविला आहे.

भाजपचे नेते रमेश राक्षे यांनी तटकरे यांच्यावर कडक शब्दात टीकास्त्र सोडले आहे. त्यांच्या विधानांचा जाहीर निषेध केला. या सर्व प्रकारातून भाजपचे कार्यकर्ते व पिचड समर्थक हे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.आता जिल्ह्यातील व तालुक्यातील नेते मंडळी याबाबत काय भूमिका घेतात या कडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या