Friday, May 3, 2024
Homeनाशिकबाजार समित्यांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल; 'या' चौदा बाजार समित्यांचा समावेश

बाजार समित्यांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल; ‘या’ चौदा बाजार समित्यांचा समावेश

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

संपूर्ण जिल्ह्याचे विशेषतः शेतकऱ्यांचे (farmers) लक्ष लागलेल्या जिल्ह्यातील चौदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Agricultural Produce Market Committees) निवडणुकांचा (election) बिगुल वाजला आहे या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्र ढवळून निघणार आहे.

- Advertisement -

यामध्ये नाशिक (nashik), पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant), लासलगाव (lasalgaon) या मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे. यामध्ये नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगावसह सिन्नर (sinnar), येवला (yeola), नांदगाव (nandgaon), मनमाड (manmad), चांदवड (chandwad),

देवळा (devla), घोटी (ghoti), दिंडोरी (dindori), कळवण (kalwan), सुरगाणा (surgana) व मालेगाव (malegaon) या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक पदाच्या (Director post) जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यासाठी प्रारूप मतदार याद्या (voter list) सोमवारी (दि.१४) प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मतदार यादीचा (voter list) कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी (District Election Officer) तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. सतीश खरे (District Deputy Registrar (Co-operative Societies) Dr. Satish Khare)) यांनी जाहीर केला आहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार सोमवार दि. १४ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दि.२३ नोव्हेंबरपर्यंत त्यावर हरकती नोंदविता येणार आहे.

दि.२४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीमध्ये दाखल झालेल्या हरकतींवर निर्णय दिला जाणार आहे. बुधवार दि.७ डिसेंबर रोजी या बाजार समित्यांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या