Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशदेशातील पहिले खाजगी रॉकेट Vikram-S चे यशस्वी प्रक्षेपण, काय आहेत वैशिष्ट्यं?

देशातील पहिले खाजगी रॉकेट Vikram-S चे यशस्वी प्रक्षेपण, काय आहेत वैशिष्ट्यं?

श्रीहरिकोटा | Sriharikota

भारतातील पहिले खासगी रॉकेट (India’s First Privately Built Rocket) विक्रम-एस (Vikram-S), आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) श्रीहरिकोटा (Sriharikota) येथून यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले.

- Advertisement -

‘स्कायरूट एरोस्पेस’ ने (Skyroot Aerospace) हे रॉकेट तयार केले आहे. ही एक प्रायोगिक मोहीम असून, त्याद्वारे ३ पेलोड्स पृथ्वीपासून सुमारे १०० किमी नेण्यात आलेत. विक्रम एस हे फक्त 6 मीटर उंच सिंगल स्टेज स्पिन स्टॅबिलाइज्ड सॉलिड प्रोपेलेंट रॉकेट आहे. ते ४२२ न्यूटनचा जास्तीत जास्त थ्रस्ट जनरेट करते. यात ४ स्पिन थ्रस्टर्स आहेत.

या रॉकेटचे वजन सुमारे ५५० किलो आहे. हे कलाम ८० प्रोपल्शन सिस्टीमद्वारे चालते, ज्याची १५ मार्च २०२२ रोजी सोलर इंडस्ट्रीज, नागपूर येथे चाचणी घेण्यात आली होती.

स्कायरूटचे बिझनेस डेव्हलपमेंट लीड सिरीश पल्लीकोंडा म्हणाले की, मिशनचा उद्देश कस्टमर पेलोडसह विक्रम-I लाँच करण्यासाठी स्टेज सेट करणे आहे. २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत विक्रम-1 रॉकेटचे पहिले प्रक्षेपण करण्याचे लक्ष्य आहे आणि स्टार्टअपकडे कस्टमरही आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या