Friday, May 3, 2024
Homeनगरराज्य पतसंस्था फेडरेशनची 14 डिसेंबरला निवडणूक

राज्य पतसंस्था फेडरेशनची 14 डिसेंबरला निवडणूक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महाराष्ट्रातील सुमारे 16000 नागरी सहकारी व पगारदार सहकारी तसेच महिला सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधित्व करणार्‍या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची निवडणूकीसाठी 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातून फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे (कोपरगाव) व सिद्धिविनायक पतसंस्थेचे अध्यक्ष वासुदेव काळे (श्रीरामपूर) या दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

- Advertisement -

या निवडणुकीसाठी 21 जागेसाठी 65 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीनंतर 35 अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत 30 नोव्हेंबर आहे. महिला राखीव, एन टी प्रवर्ग आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग राखीव जागांवर सहकार समृद्धी पॅनलच्या चार उमेदवारांचे एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. महिलांसाठी राखीव गटातून नाशिक येथील कल्याणी महिला पतसंस्थेचे अध्यक्षा अंजली पाटील, बारामतीच्या भारती मुथा, अनुसूचित जाती जमाती गटातून वसईचे शरद जाधव आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातून राजुदास जाधव यांचा समावेश आहे.

उर्वरित जागांसाठी सहकार समृद्धी पॅनलचे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे यांच्या पॅनलचे 21 उमेदवार रिंगणात आहेत. बिनविरोध निवड निश्चित मानली जात असलेल्या उमेदवारांमध्ये नगर जिल्ह्यातून दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात ओमप्रकाश तथा काका कोयटे व वासुदेव काळे यांचा समावेश आहे.

ही निवड बिनविरोध झाल्यास वासुदेव काळे यांच्या रूपाने पहिल्यांदाच राज्य पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी निवडीचा श्रीरामपूरला हा बहुमान प्राप्त होणार आहे. सहकार भारतीचे राष्ट्रीय सचिव डॉ. उदय जोशी व काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली फेडरेशनची निवडणूक बिनविरोध होईल, असे चित्र दिसत आहे.

नगर जिल्ह्यातील उमेदवारांच्या उमेदवारीचे सुशीलाताई नवले, याकूबभाई बागवान, बापूसाहेब जौक, अनिरुद्ध महाले, अरुण पाटील नाईक, रवींद्र गुलाटी, दिलीप गायके, रवींद्र खटोड, पुरुषोत्तम मुळे, अशोक राशिनकर, राजेश राठी, देविदास चव्हाण, शैलेशभाई बाबरिया, सोमनाथ बोंबले, विद्या काळे, स्नेहलता कुलथे यांनी स्वागत केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या