अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बाथरूममध्ये अंघोळ करणार्या विवाहितेची लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी संतोष बोरूडे (रा. चौरे मळा, श्रीरामनगर) या तरुणाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.
- Advertisement -
संतोष बोरूडे याने सुमारे सहा महिन्यांपासून ते 23 नोव्हेंबरपर्यंत फिर्यादीच्या मोबाईलवर वेळोवेळी फोन करून शरीर सुखाची मागणी केली. एक दिवस फिर्यादी बाथरूममध्ये अंघोळ करत असताना त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच वेळोवेळी फोन करून शेजारी राहणार्या महिलेसोबत बोलणे करून देण्याचे सांगितले.
फिर्यादी यांनी त्याला नकार दिल्यानंतर त्याने फिर्यादीसह त्यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.