Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याखाद्यतेलाच्या किमती कमी होणार?

खाद्यतेलाच्या किमती कमी होणार?

मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती (Edible oil prices) घसरल्या असून त्यानंतर देशात खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खाद्यतेलाच्या किमती घसरल्या तर सर्वसामान्यांचा दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

आधीच महागाई वाढली असताना त्यात खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते. अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे. याचा फायदा देशांतर्गत बाजारात दिसून येईल. त्यामुळे आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती खाली येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या