Friday, May 3, 2024
Homeनगरटेम्पो-टँकर धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी

टेम्पो-टँकर धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

टेम्पो व टँकरची धडक होऊन टेम्पो चालकाचा मृत्यू झाला असून टेम्पोतील एक जण जखमी झाला आहे. असगरखान दिलावर खान (वय 42 रा. नागपूर) असे मयताचे नाव आहे. जबीर हमीद शेख (रा. नागपूर) हे जखमी झाले आहेत.

- Advertisement -

नगर-कल्याण बायपास रोडवरील ओव्हर ब्रिजजवळ हा अपघातात झाला. याप्रकरणी टँकरवरील अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अख्तार खान दिलावर खान (वय 46 रा. नागपूर) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या