Friday, May 3, 2024
Homeनाशिकअर्भक मृत्यू; 6 जणांना कारणे दाखवा नोटीस

अर्भक मृत्यू; 6 जणांना कारणे दाखवा नोटीस

नाशिक । प्रतिनिधी Nashik

चिखलओहोळ (ता. मालेगाव) ( Malegaon- Chikhalohoal)येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार न मिळाल्याने एका नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी या आरोग्य केंद्रातील दोन वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्यसेविका, औषध निर्माण अधिकारी तसेच परिचर अशा सहा अधिकारी, कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

- Advertisement -

चिखलओहोळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मंगळवारी (दि.6) सकाळच्या वेळी सोनाली दिलीप शिंदे यांची प्रसूती झाली. मात्र, दुपारी अर्भकाची प्रकृती खालावल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने हे अर्भक दगावले,असा आरोप कुटुंबातर्फे करण्यात आलेला आहे.

या आरोग्य केंद्रामधील डॉक्टर आणि आरोग्य सहाय्यक हे हजेरी वहीमध्ये स्वाक्षरी करून केंद्रात उपस्थित नसल्याचे तपासात उघड झाले आहे. यामुळे चौकशी अधिकारी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते आणि डॉ. युवराज देवरे यांनी याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला आहे. त्यानुसार मित्तल यांनी या सहा कर्मचार्‍यांना आपण आरोग्य केंद्रात का उपस्थित नव्हता? अशी नोटीस काढून पाच दिवसात खुलासा करण्यास सांगितले आहे.

अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी आपणास जबाबदार का धरले जाऊ नये? याबाबतही खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डॉ. नेहेते यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून पीडित कुटुंबासह गावकर्‍यांशीही संवाद साधत त्यांच्याकडूनही केंद्रातील कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या