Friday, May 3, 2024
Homeजळगाव१२ वर्षांनी सापडला... तो पत्नीच्या संकल्पामुळेच...!

१२ वर्षांनी सापडला… तो पत्नीच्या संकल्पामुळेच…!

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

- Advertisement -

पत्नीच्या (wife’s) दृढ इच्छशक्तीमुळे बारा वर्षांपूर्वी रागाच्या भरात घरातून निघून गेलेला पती सापडला (Found the husband) आहे. पत्नीनेने मालेगाव येथील नुकत्याच झालेल्या शिवपुराण कथेच्या (Shivpuran story) श्रवणादरम्यान केलेल्या संकल्पामुळेच…!

चाळीसगाव-धुळे रोडवरील पूर्वीच्या गोत्रे मळा येथील रहिवाशी तुकाराम गणपंत गोत्रे ( ५०) हे गेल्या १२ वर्षापूर्वी (सन २००९-१०) घरात झालेल्या कौटुबींक वादामुळे रागाच्या भरात घरातून निघून गेले होते. कुंटुंबातील सदस्यांनी त्यांच्या सर्वत्र शोध घेतला, मात्र ते मिळुन आले नाही. गेल्या बारा वर्षांपासून आई-वडिल, भाऊ, पत्नी, एक मुलगा, दोन मुली व इतर सदस्ये त्यांच्या परतण्याची वाट पाहत होते. त्यांची प्रतिक्षा आता संपली असून महाशिवपुराण कथेच्या योगोयोगाने पत्नी संगीताच्या जीवनात पुन्हा पती तुकाराम नामाचा सुर गवसला आहे. तब्बल १२ वर्षांच्या तपानतंर २०२३ च्या पूर्वसंध्येला पतीचे घरी आगमन होणार असून २०२४ ची सुरुवात पुन्हा नवीन संसाराने सुरु होणार आहे.

चाळीसगाव पासून अवघ्या एक तासांच्या अंतरावर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात मागील सात दिवसांपासून महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवसात लाखो भाविकांनी शिवमहापुराण कथेचे श्रवण केले आहे. पंडित प्रदीप मिश्रा श्री शिव महापुराण कथा श्रवणासाठी चाळीसगाव येथून दररोज हजारोंच्या संख्येने भाविक मालेगाव येथे जात होते. गेल्या सात दिवसांमध्ये चाळीसगाव येथून लांखो भाविकांनी कथा श्रवणासाठी हजेरी लावली. भव्य मंडपाबाहेर भक्तीचा मधूर नाद, चंदनाचा सुगंध दरवळावा अशा भक्तीमय वातावरणात मालेगाव शहर महाकालमय झाल्याचा अनुभव चाळीसगाव येथून गेलेल्या भाविकांना आला. चाळीसगाव येथून घरातून निघून गेलेले तुकाराम गोत्रे यांच्या पत्नी संगीतासह परिवारातील इतर महिला कथेच्या सुरुवातीच्या तीन दिवस कथा श्रवणासाठी मालेगाव येथे मुक्कामी होते, कथा श्रवण करतांना पत्नी संगीता यांनी पतीचा शोध लागावा यासाठी संकल्प बोलून दाखवला.

तीन दिवसांच्या कथा श्रवणानतंर त्या घरी परतल्या आणि घरी देखील टीव्हीवर कथा श्रवणांचा आनंद त्या घेत होते. घरी परतल्या दुसर्‍याच दिवशी योगोयोगाने कुंटूबातील सदस्यांना चाळीसगाव पोलीस स्टेशनमधून फोन आला, आणि गोत्रे नावाचा व्यक्ती सापडल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच भाऊ नवनाथ गोत्रे व पुतण्या प्रविण गोत्रे यांनी चाळीसगाव पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलीस निरिक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ.पंढरीनाथ पवार यांनी संबंधीत व्यक्तीला फोन लावला. व तुकारामच असल्याची व्हिडीओ कॉल करुन खात्री करुन घेतली.

लागलीच ते तुकारामाला घेण्यासाठी रवाना झाले. आज ते चाळीसगाव येथे दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. केवळ पत्नी संगीताचा पती परतण्याच्या बाबतचा दृढ विश्‍वासामुळेच, व योगायोगाने महाशिवपुराण कथेच्या श्रवणामुळेच झाल्याची चर्चा सर्वत्र आहे. पती परतण्याची आनंद वार्ता समझल्यानतंर पत्नी संगीताने, मालेगाव येथे महाशिवपुराण कथेच्या शेवटच्या दिवशी पुन्हा मालेगाव गाठले, आणि घडलेला प्रकार पत्राव्दारे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या समोर मांडला. त्यांनी देखील तो सर्वांसमोर वाचून दाखवल्यामुळे चाळीसगावचे नाव संपूर्ण जगात टीव्हीच्या माध्यमातून गेले. आजही भारतात पतीला देव मानणारी आधुनिक सावित्री पाहवयास यानिमित्ताने मिळाली आहे.

असा लागला तुकारामचा शोध-

तुकाराम गोत्रे रागाच्या भरात १२ वर्षापूर्वी चाळीसगाव येथून निघून गेला. तब्बल बरा वर्ष तो देशातील विविध भागात सारखा फिरत राहिला. गेल्या महिनाभरापासून तो कलानपूर, जि.रोहतक, राज्य-हरियाणा येथील एका शेतकर्‍याकडे राहत होता. या शेतकर्‍यांनी त्याला बोलते केले. आणि त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेतली, तेव्हा तुकाराम याने चाळीसगाव, जळगाव जिल्ह्याबद्दल माहिती त्याना दिली. त्यांनी त्याच्या सांगली येथील मित्राला फोन लावला. आणि तुकाराम बद्दल माहिती दिली. सांगली येथील मित्राने ‘ गुगल ’ च्या माध्यामातून चाळीसगाव पोलीस स्टेशनचा फोन नंबर मिळवला, व चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक के.के.पाटील यांच्याशी संपर्क केला.

के.के.पाटील यांनी पोकॉ.पंढरीनाथ पवार यांना सूचना देवून, तुकारामच्या कुुंटुंबाशी शोध घेण्याबाबत सांगीतले असता, पंढरीनाथ पवार यांनी तुकाराम यांचे पुतणे प्रविण गोत्रे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली, त्यांनी लागली पोलीस स्टेशन गाठून तुकाराम ज्या शेतकर्‍याकडे होता. त्यांच्याशी संपर्क साधला व व्हिडिओ कॉलच्या माध्यामातून त्याची ओळख पटवून घेतली. आणि लागलीच कारने त्याला घेण्यासाठी हरीयाणा येथे रवाना झाले. आज शनिवारी ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी, पुन्हा आयुष्याच्या नव्या वर्षाला सुरुवात करण्यासाठी तुकारा घरी येत असून घरात दिवाळीपेक्षा मोठा आनंदोत्सव साजरा होणार आहे.

कथेसाठी चाळीसगावातून लाखो भाविकांची हजेरी

मालेगाव येथे नुकताच्या संपन्न झालेल्या शिवपुराण कथेच्या श्रवणासाठी चाळीसगावातून सात दिवसात लांखो भाविकांनी हजेरी लावली. शहरातील अनेक भागातून खाजगी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. तर नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी देखील आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी वाहनाची व्यवस्था केली होती. दररोज हजारो भाविक बसने चाळीसगाव-मालेगाव प्रवास करतांना दिसून आले. गेल्या सात दिवसात कथा श्रवणाबाबत व तेथील गर्दीबाबत आता तालुक्यात घरोघरी चर्चा सुरु आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या