Tuesday, May 7, 2024
Homeनाशिकनववर्ष स्वागताला चिमुकल्यांची कलाकृती

नववर्ष स्वागताला चिमुकल्यांची कलाकृती

निफाड । प्रतिनिधी | Niphad

नव्या वर्षाची नवी पहाट, नवा सूर्य, नवी ऊर्जा, नवी प्रेरणा देणारे असते. वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड (niphad) शाळेतील (school) विद्यार्थी (students) नवीन वर्षाच्या (new year) स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

- Advertisement -

नववर्षाच्या पूर्वसंध्येला या चिमुकल्यांनी (childrens) आपल्या कल्पकतेने रंगीबेरंगी सूर्य साकारत नववर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. शिक्षक गोरख सानप यांनी कार्यानुभव अंतर्गत वाया गेलेल्या जुन्या वह्यांच्या पुठ्ठ्याचा वापर करून रंगकाम व चिकटकाम करून विद्यार्थ्यांच्या (students) मदतीने आकर्षक सूर्य साकारले. तसेच नवीन वर्षात करावयाचे संकल्प व ते संकल्प पूर्तीसाठी करावयाचे प्रयत्न याविषयी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी चिमुकल्यांनी खोटे बोलणार नाही, व्यायाम करेन, मोबाईल जास्त बघणार नाही, मैदानावर खेळेन, आई-वडील यांना घरकामात मदत करेन, स्वच्छता पाळेन, पर्यावरणाचे रक्षण करेन, वीज, पाणी यांची बचत करेन, प्रामाणिक राहीन, मित्रांना सहकार्य करेन, वडीलधार्‍या व्यक्तींचा मान राखेन, नियमित अभ्यास करेन यासारख्या नवीन गोष्टी करण्याचा संकल्प केला. नूतन वर्षात केलेले छोटे संकल्प व ते पूर्ण करण्यासाठी बालमनावर केलेली संस्कारमय शिकवण चिमुकल्यांना भविष्यात नक्कीच मोठे फायदे करून देईल.

सानप यांनी संस्काराची रूजवणूक करणार्‍या या उपक्रमाचे न्या.रानडे विद्याप्रसारक मंडळ निफाड संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष वि.दा. व्यवहारे, सचिव रतन वडघुले, संस्थापक विश्वस्त अ‍ॅड.ल.जि. उगांवकर, राजेश राठी, किरण कापसे, राजेश सोनी, अ‍ॅड.दिलीप वाघावकर, मधूकर राऊत, विश्वास कराड, नरेंद्र राठी, प्रभाकर कुयटे, गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, विस्तार अधिकारी कैलास बोरसे, मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे, केंद्रप्रमुख निलेश शिंदे आदींसह पालकांनी कौतुक केले. यावेळी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या