Friday, May 3, 2024
Homeनगरभाजपच्या नव्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ना. विखे तर आ. थोरातांचाही प्रयत्न; कोणी केला...

भाजपच्या नव्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ना. विखे तर आ. थोरातांचाही प्रयत्न; कोणी केला दावा ?

औरंगाबाद | Aurangabad

भाजपकडून राधाकृष्ण विखे-पाटील हा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगत एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी यांनी काल औरंगाबादेत पत्रकारांशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. प्रकाश आंबेडकरांनी विधान परिषद निवडणुकीतील सत्यजित तांबे अपक्ष उमेदवारीच्या आडून भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी काँग्रेसलाही टोला लगावला आहे.

- Advertisement -

काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होण्यासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही प्रयत्नशील आहेत. ती खेळी माझ्या अंदाजानं बाळासाहेब थोरात विरोधात राधाकृष्ण विखे पाटील अशी आहे, असं मी त्या ठिकाणी मानतो. देवेंद्र फडणवीस यांना आवडणार नाही, परंतु भाजपचा नवीन मुख्यमंत्र्यांचा चेहरा हा राधाकृष्ण विखे पाटील होऊ शकतात. त्याचबरोबर जी काही नगरमधली खेळी झालेली आहे, त्यातून बाळासाहेब थोरातांनाही इच्छा झालेली दिसतेय की, आपण काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा व्हावं, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर होऊ घातलेल्या युतीवरही भाष्य केलंय. बाळासाहेब ठाकरेंचे प्रबोधनकार वडील होते, प्रबोधनकार यांचा आणि बाबासाहेबांचा लढा एकत्र होता. बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाला मी अवसरवादी हिंदुत्व म्हणत असतो.

उद्धव ठाकरेंनी माझ्या आजोबांचं हिंदुत्व मी घेतोय हे जाहीर केल्यामुळे धर्म सुधारण्याची चळवळ सुरू झाली, असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलंय.

चंद्रकांत पाटलांचा मी सत्कार करायला तयार आहे. शिवाजी पार्कला 5 लाख लोक जमवून मी आपला सत्कार करणार आहे. कोणी कोणी भिकेचे पैसे घेऊन आपल्या संस्था उभ्या केल्या. उरलेल्या संस्था या खोक्याच्या संस्कृतीतून उभ्या केल्या हे का तुम्ही विसरताय. मंत्रिपद टिकवण्यासाठी सत्य त्यांनी अप्रत्यक्षपणे मांडलं. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मी मानतो, असा टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावलाय.

- Advertisment -

ताज्या बातम्या