Friday, May 3, 2024
Homeनगरअवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला

अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

डंपर व सहा ब्रास वाळू असा 20 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला. नगर-जामखेड रोडवर पोलिसांनी ही कारवाई केली. डंपर मालकासह चालकाविरूध्द जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार कमलेश पाथरूट यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

डंपर मालक नितीन परमेश्वर आजबे व चालक अनिल सोमनाथ राळेभात (वय 25, दोघे रा. जमादारवाडी ता. जामखेड) अशी त्यांची नावे आहेत. त्यातील चालक अनिल राळेभात याला अटक केली आहे. अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले आहेत.

त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मनोहर शेजवळ, विश्वास बेरड, संदीप घोडके, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, पाथरूट यांचे पथक जामखेड हद्दीत अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करत असताना मिळालेल्या माहितीनुसार नगर-जामखेड रोडवरील सहारा हॉटेलसमोर सापळा लावून डंपर पकडला. त्यातील चालक राळेभात याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून 20 लाख रूपये किंमतीचा डंपर व 60 हजार रूपये किंमतीची सहा ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या