Friday, May 3, 2024
Homeनाशिकमालेगावी बहरली अ‍ॅपल बोरांची शेती; पाहा व्हिडीओ

मालेगावी बहरली अ‍ॅपल बोरांची शेती; पाहा व्हिडीओ

नाशिक | Nashik

मालेगाव तालुक्यातील (Malegaon Taluka) पिंपळगाव (Pimpalgaon) येथील उपक्रमशील शेतकरी रविंद्र पवार यांनी आपल्या शेतात योग्य नियोजन करून बोरांची बाग (Ber Garden) फुलविली आहे. त्यामुळे त्यांची ही शेती जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती देतांना पवार यांनी सांगितले की, बोरांच्या बागेची लागवड पाच वर्षांपूर्वी केली असून यामध्ये दोन प्रकारच्या व्हरायटिंचा समावेश आहे. त्यात एक व्हरायटी अ‍ॅपल सारखी तर दुसरी नारळासारखी दिसत असून याठिकाणी अ‍ॅपल बोरांची (Apple Ber) लागवड केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की, या अ‍ॅपल बोरांना रोग आणि किडीपासून सांभाळावे लागते. तसेच दरवर्षी जमिनीपासून (Land) दोन फुटापर्यंत बोरांच्या झाडांची छाटणी करावी लागते. याशिवाय १ मे ला झाडांना (Trees) पाणी दिले तर साधारणता डिसेंबर महिन्यामध्ये माल काढणीला येतो. त्यानंतर महिनाभर उत्पादन चालू राहते, असे पवार यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या