Sunday, May 5, 2024
HomeजळगावPhotos # गोद्री कुंभाच्या समारोपाप्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांचे...

Photos # गोद्री कुंभाच्या समारोपाप्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांचे मोठे वक्तव्य

अमोल कासार

जळगाव jalgaon । सनातन धर्म हा मानवतेचा धर्म असून या धर्मात जन्माला येणे हे अत्यंत भाग्यशाली मानले जात. या धर्मात आम्ही इतर कोणत्याही धर्मीयांना त्रास न देण्याची आमची भुमिका आहे. परंतु काही धर्माधरांकडून राजकीय उद्देश समोर ठेवून धर्मांतरण करीत आहे. धर्मांतरणासाठी आमच्या श्रद्धेसोबत छेडछाड करात तर सनातन धर्म हे कदापी सहन करणार नाही असा इशाराच नाथ संप्रदायाचे व गोरक्षपीठ प्रमुख तथा उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी दिला.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा लबाना नायकडा समाज कुंभाच्या समारोपच्या दिवशी होणार्‍या कार्यक्रामातून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर द्वारकापीठाधीश्वर श्री शंकराचार्य, योगगुरू रामदेव बाबा, महामंडलेश्वर जनार्दन महाराज, पालमश्रमचे गोपाल चैतन्य महाराज, पोहरादेवीचे बाबूजी महाराज, राष्ट्रीय स्वंयकसेवक संघाचे भैय्या जोशी, धर्म जागरण सभेचे प्रमुख शरद ढोले,शामकुमारजी यांच्यासह मुख्य संत महंत यांची उपस्थिती होती. तर शेजारी असलेल्या सभा मंडपातील व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते मंत्री गिरीश महाजन, आ. चिमणराव पाटील, आ. संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण, आ. लता सोनवणे, आ. किशोर अप्पा पाटील, खा. रक्षा खडसे, आ. जयकुमार रावळ उपस्थित होते.

Beauty Part 3 : हिवाळा ते उन्हाळा संक्रमणासाठी आपली त्वचा सज्ज करा..

पुढे बोलतांना योगी आदिनाथ म्हणाले की, सनातन धर्म हा जगातला सर्वात प्राचीन धर्म असलेला धर्म असून या धर्मात आपण जन्माला येणे हे भाग्यशाली आहे. सनातन धर्मात प्रत्येकालासुरक्षेचे कवच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगिले. तसेच गेल्या काही वर्षात भारत वेगाने विकास करतोय, गेल्या आठ वर्षांत मोदींच्या नेतृत्त्वात वेगाने प्रगती करतोय. सद्यस्थितीत भारत जगातील पाचवी विकसित अर्थव्यवस्था आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था जगात नंबर वन होईल यात तिळमात्र शंका नाही. तसेच सर्व विकसीत 20 देशांचे नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळाली असल्याचे ते यावेळी म्हणाले.

जळगावच्या माहेरवाशिनीची नाशिकच्या सासरी
आत्महत्या आई व मुलगी झाली बेपत्ता

नवीन वर्षात रामल्ला होणार विराजमान

राष्ट्रपती भवनातील मुगल गार्डनचं नाव बदलवून ते अमृत उद्यान बदलण्यात आले आहे. पाचशे वर्षे वनवासात असलेले भव्य राम मंदिर पूर्ण होण्याच्या मार्गावर असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला रामल्ला त्याठिकाणी विराजमान होणार असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

धर्मांतरण ठांबविण्यासाठी एकत्रीत लढा

भारतात सांस्कृतिक, आध्यात्मिक संस्कृती जपली जाते. काही धर्म राजकीय उद्देशाने दुसर्‍या धर्मातील धर्मांतर करत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. आपण सर्वांनी एकत्रीत येवून लढा दिल्यास धर्मांतर थांबविणे शक्य होईल. तसेच त्यासाठी जगातील कुठलीही ताकद आपल्या रोखू शकत नाही. हीच ताकद कोरोना काळात संपुर्ण जगाने पाहिली असल्याचे योगी यावेळी म्हणाले.

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

कुंभाचा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर नेण्याची गरज

ब्रिटीश व मुघल राजवटीमध्ये बंजारा समाजाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा समाज नेहमीच अग्रभागी राहून लढला असल्याने ते शक्यत झाले नाही. उत्तर प्रदेशमध्ये कुणीही धर्मांतर करू शकत नाही, केलं तर दहा वर्षे शिक्षा होत असल्याने तसा कायदाच तयार करण्यात आला आहे. यापुर्वी धर्मांतरण झालेल्यांच्या घरवापसीसाठी कायद्याची गरज नाही. बंजारा कुंभचा हा कार्यक्रम आदर्श म्हणून राष्ट्रीय स्तरावरून पुढे नेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Beauty Part 2 : विवाह सोहळ्यात असा करा ब्राइडल मेकअप हिवाळ्यात असे करा तुमच्या त्वचेचे रक्षण !

दोन संविधानावर देशाची वाटचाल- योगगुरु रामदेव बाबा

हिंदू धर्म हा राष्ट्र धर्म नसून तो विश्वधर्म आहे. धर्मांतरणासाठी कोणतेही षडयंत्र ही स्थिती बदलवू शकत नाही. तसेच हा विश्व व युग धर्म असून 1 लाखांपेक्षा अधिक ग्रंथ, वेद, पुराण हे आपल्या देशाची संपत्ती आहे. भारत देश हा दोन संविधानावर चालतो. यामध्ये संविधानावर देश तर जीवन सनातन संविधानावर चालत असल्याचे योगगुरु रामदेवबाबा यांनी व्यक्त केले.

हिंदूचा डीएनए सनातन धर्माचा

देशात झालेले धर्मांतरण हे स्वत:च्या मनाने झालेले नसून त्यांच्याकडून क्रुरतेने करुन घेतले आहे. सर्व हिंदूचा डिएनए सनातन धर्माचा आहे. कुणी प्रलोभन देऊन धर्मांतर करत असेल ते वेळीच रोखुन त्यांना धर्मांतरीत होवू देवू नका. ज्यांनी केलं त्यांना परत धर्मात आणूया असे आवाहन देखील रामदेव बाबा यांनी केले. तसेच पूर्वी काही लोकांनी भेदभावची भिंती बांधल्या होत्या, पण आज संघटित व्हा, एकमेकांना मदत करण्याचा संकल्प करा.देशाला वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करण्याचे आवाहनही रामदेव बाबा यांनी केले.

उपमुख्यमंत्र्यांची व्हीसीद्वारे उपस्थिती

कुंभ मेळाव्यासाठी मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे एकाच विमानाने मेळाव्यासाठी मुंबईहून निघाले. मात्र दुपारी एक वाजता विमान तांत्रिक बिघाडाचे कारण देत दोघे माघारी परतल्याचे आयोजकांनी जाहीर केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भाविकांशी संवाद साधला.

कामाच्या ठिकाणी होणारे डोळ्याचे अपघात कसे टाळावे? प्रथमोपचार कसे करावे? जाणून घ्या सविस्तर

महंतांसह राजकीय व्यक्तींसाठी स्वतंत्र व्यासपीठ

फत्तेपूर ते गोद्री रस्त्यावरील शेकडो एकर शेतामध्ये ठिकठिकाणी सभामंडप उभारण्यात आले होते. तसेच मुख्य धर्मसभेसाठी तीन मोठे सभामंडप तयार करुन तीन व्यासपीठ देखील होते. मुख्य व्यासपीठ मध्यभागी होते त्यावर द्वारकाधीशापीठ शंकराचार्य स्वतंत्र आसनावर विराजमान त्याच व्यासपीठावर रामदेव बाबा यांच्यासह योगी आदिनाथ, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच इतर पिठाचे मुख्य महंतांची व्यवस्था करण्यात आली होती. तर अन्य एका व्यासपीठावर राजकीय नेते मडळीत तर तिसर्‍या व्यासपीठावर देशभरातून आलेले सर्व महंत उपस्थित होते.

जय सेवालालच्या जयघोषणाने दुमदुमले गोद्री

बंजारा समाजाच्या कुंभ मेळाव्याच्या समारोपाप्रसंगी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सभास्थळी आगमन होताच उपस्थितांकडून एकच जल्लोष करीत घोषणाबाजी करण्यात आली. तसेच धर्मसभेला देशभरातील विविध राज्यातून बंजारा समाज बांधव सकाळपासून आले होते. यावेळी त्यांच्याकडून जय सेवालाल व जय श्री राम चा जयघोष केला जात होता. या जयघोषणाने संपुर्ण गोद्री गाव दणाणून गेले होते.

व्यापीठावर रामदेवबाबांचे प्रात्यक्षिक

धर्मसभेत मार्गदर्शन करीत असतांना पतांजली पीठाचे योगगुरु रामदेव बाबा यांनी व्यासपीठावर उपस्थितांना योगाचे प्रात्यक्षिकांसह सुर्यनमस्कार करुन दाखविले.

आई व मुलगी झाली बेपत्ता

- Advertisment -

ताज्या बातम्या