Friday, May 3, 2024
Homeजळगावजिल्हा परिषद डीएचओंचा तडकाफडकी राजीनामा!

जिल्हा परिषद डीएचओंचा तडकाफडकी राजीनामा!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सध्या व्हायरल इन्फेशन, सर्दी, खोकला, तापची साथ वाढली असल्याने जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) आरोग्य केंद्रांसाठी (health centers) औषध पुरवठा (Drug supply) करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून 4 कोटींचा निधी मिळाला आहे. कोट्यावधीचा निधी देवून देखील जिल्हा आरोग्य विभागाकडून औषध खरेदी करण्यास विलंब झाल्याचे प्रकरण दैनिक देशदूतने चव्हाट्यावर आले होते. त्यानंतर प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी (District Health Officer in charge) डॉ.तुषार देशमुख यांनी आज तडकाफडकी राजीनामा (resignation) जि.प.सीईओंकडे दिला आहे. जि.प.आरोग्य विभागासाठी 4 कोटींची औषध खरेदी विलंबप्रकरण भोवले असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात रंगली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्दी, खोकला, ताप आणि व्हायरल इन्फेशनची साथ मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांत लहान बालकांसह वृध्द उपचार घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना मात्र, बाहेरुन औधष खरेदी करावी लागत असल्याची ओरड सुरु झाली होती. जिल्हा आरोग्य विभागाकडून औषधांची खरेदी करण्यास विलंब कशामुळे झाला? 4 कोटींच्या औषध खरेदीला शासनाकडूनच प्रशासकीय मान्यता नसल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रात औषधी खरेदीची प्रक्रिया रखडल्याचे प्रकरण समोर आले. मग जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडून वेळेत प्रशासकीय मान्यतेसाठी पाठपुरावा का करण्यात आला नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

Makeup Part 4 # असा करा Self makeup

गेल्या आठवड्यातच जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देत आरोग्य यंत्रणेतील 22 कर्मचार्‍यांना नोटीसा बजावल्या होत्या. तसेच जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांवर शिरफ औषधींचा साठाच शिल्लक नसल्याने आरोग्य विभागाचा कारभार रामभरोसे असल्याचे चित्र होते. प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.तुषार देशमुख यांच्याविषयी आरोग्य विभागातील वाढत्या तक्रारीमुळे त्यांनी मंगळवारी जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा राजीनामा तडकाफडकी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडे सुपूर्द केला. डॉ.देशमुख यांनी राजीनामा दिल्याने त्यांची रवानगी जिल्हा वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र बांभोरी येथे मूळ जागेवर करण्यात आली आहे. तर प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ.रवींद्र चौधरी यांच्याकडे पदभार दिला असल्याचे जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितले.

4 कोटीच्या औषध खरेदीला प्रशासकीय मान्यता

शासनाकडून जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांसाठी 4 कोटींच्या औषध खरेदीला शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या औधष खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे, असे जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या