Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यालॉन्ग मार्चमध्ये शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

लॉन्ग मार्चमध्ये शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई | Mumbai

विविध मागण्यांसाठी शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांनी विधानसभेवर नाशिक ते मुंबई पायी लॉन्ग मार्च काढला असून आता हा लॉन्ग मार्च मुंबईच्या वेशीवर पोहचला आहे. मात्र, या लॉन्ग मार्च दरम्यान एक दु:खद घटना घडली असून एका आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू (Farmers Death) झाला आहे.

- Advertisement -

अवकाळी पावसाचे राज्यात पाच बळी

याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील मावडी येथील पुंडलिक दादा जाधव (Pundlik dada Jadhav) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. काल (१७ मार्च) रोजी या शेतकऱ्यास अस्वस्थ वाटू लागल्याने मोर्चेकऱ्यांनी त्यांना तातडीने शहापूर ग्रामीण रुग्णालयात (Shahapur Rural Hospital) दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून (CMO Fund) पाच लाखांची मदत दिली जाईल, अशी माहिती नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada bhuse) यांनी दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या