Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामोगरे खून प्रकरण : संशयित हरियाणातून ताब्यात; एक अद्याप फरार

मोगरे खून प्रकरण : संशयित हरियाणातून ताब्यात; एक अद्याप फरार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मागील गुरुवारी नाशिक शहराला हादरुन टाकणारी घटना इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत घडली होती. कारखान्यातून नोकरी आटोपून मोटारीतून घरी जाणाऱ्या एका खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकावर दोघांनी चाकूने 24 वार करून गंभीर जखमी केले होते. दुसऱ्या दिवशी त्याचे रुग्णालयात उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले होते…

- Advertisement -

आरोपींचा शोध घेण्यासाठी एकूण चार पथके तयार करण्यात आली होती. या प्रकरणात हरियाणामधून एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यास नाशिक पोलिसांना यश आले आहे. त्याचा साथीदार तसेच हल्ल्यातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याच्या मागावर नाशिक पोलीस आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फाळके स्मारकाजवळ समांतर रस्त्यावर थांबलेल्या एका खासगी कंपनीच्या सीईओंवर दोघा हल्लेखोरांनी सपासप चाकूने वार केले होते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले योगेश सुरेश मोगरे (३९, रा. इंदिरानगर) यांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोरांनी मोगरे यांची किया कार (के. एम. ए. १५ ए ४९५९) चोरून नेली होती.

घटनेच्या दुसऱ्याच दिवशी गुन्ह्याचा तपास इंदिरानगर पोलीस स्टेशनकडून पोलीस निरीक्षक आनंदा वाघ गुन्हे शाखा युनिट २ यांच्याकडे देण्यात आला होता. कोणताही धागादोरा नसल्याने हा गुन्हा उघडकीस आणणे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते.

धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहा पथके तयार केली होती. घटनास्थळावर साक्षीदाराने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे सर्व मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावरून आरोपीची शरीरयष्टीबाबत किरकोळ माहिती मिळाली. दरम्यान आरोपीनी जबरीने हिसकावून नेलेली किया कार बेळगांव रोडवर बेवारस सोडुन दिलेली मिळुन आली.

तपासात घटनास्थळास दिलेल्या भेटीतून काही भौतिक पुराव्याच्या आधारे गुन्हयातील आरोपी हरियाणा येथून मुंबई व नंतर नाशिक येथे आल्याचे निष्पन्न झाल्याने तात्काळ सपोनी सुर्यवंशी, पो.हवा रोकडे, जगझाप, सोनवणे, सुंदरे, चव्हाण, चकोर, जाधव खंडणी विरोधी पथक यांचे पथक मुंबई येथे गेले. तर एक पथक हरीयाणा येथे रवाना करण्यात आले.

मोदींना अडकवण्यासाठी सीबीआयने माझ्यावर…; अमित शाहांचा कॉंग्रेसवर गंभीर आरोप

सपोनि मोहिते यांच्या पथकाने हरीयाणा येथून एकास ताब्यात घेतले. त्याची विचारपुस केली असता त्याने सांगितले की, त्यांनी एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या खंडणीसाठी गाडीसह अपहरण करण्याचे ठरविले होते. ८ दिवस मुंबईत राहून तेथे प्रयत्न केला. परंतु गाडी न मिळाल्याने ते दि. २३ मार्च रोजी नाशिक येथे आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

उद्धव ठाकरेंचे भाजप-शिंदे गटावर टीकास्त्र; म्हणाले, सध्या राजकारणात…

गाडी चोरण्याच्या उद्देशाने हा गुन्हा केल्याचे त्याने काबुल केले आहे. फिर्यादी यांनी गाडीची चावी देण्यास प्रतिकार केल्याने चाकूने वार केल्याचे सांगितले. गुन्ह्यातील दुसरा आरोपी अजितसिंग सत्यवान लठवाल (रा चुडाना, हरीयाणा) हा निष्पन्न झाला असून लवकरच त्यास जेरबंद करण्यात येईल, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या