Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशजपानचे पंतप्रधान फुमिओ कुशीदा यांच्यावर भर सभेत जीवघेणा हल्ला

जपानचे पंतप्रधान फुमिओ कुशीदा यांच्यावर भर सभेत जीवघेणा हल्ला

दिल्ली | Delhi

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. पंतप्रधान फुमियो किशिदा भाषण देत असताना त्याचवेळी स्मोक बॉम्ब हल्ला झाला.

- Advertisement -

मात्र, सुरक्षा रक्षकांनी तत्काळ पावलं उचलल्याने बॉम्बचा स्फोट होण्याआधीच फुमियो किशिदा यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. वाकायामा येथे पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी ते आले होते.

मुलाच्या आजारपणाला कंटाळला, बापाने उचलले टोकाचे पाऊल…जे केलं तेही हैराण करणारे…

मिळालेल्या माहितीनुसार, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारासोबत बोलत उभे होते. तेवढ्यात त्यांच्या दिशेने एक पाईप बॉम्ब फेकण्यात आला. परंतु, तो फुटण्याआधीच किशिदा यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. याठिकाणी स्फोटासारखा मोठा आवाज आल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

आवाज आल्याने उपस्थितांमध्ये गोंधळ निर्माण झाला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील दृश्यानुसार सभेसाठी आलेले लोक इतरत्र सुरक्षित जागा शोधण्यासाठी धावाधाव करताना दिसत आहेत. दरम्यान, हा हल्ला झाल्याने किशिदा यांचे येथील भाषण रद्द करण्यात आले. तसंच, फुमियो किशिदा सुखरूप असून त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.

धक्कादायक! डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट; १८ हजार गायींचा होरपळून मृत्यू

या पूर्वी जपानचे पंतप्रधान शींजो आबे यांच्यावर देखील भर रस्त्यावर एकाने गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण जग हादरले होते. शींजो आबे हे जपानचे सर्वात मोठे नेते होते. त्यांच्या मृत्यूनंतर फुमिओ कीशिदा हे पंतप्रधान झाले. त्यांच्यावर देखील हल्ला करण्यात आल्याने जापानच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

अंगात पोलिसाचा गणवेश, पायात लाल शूज; फुकटेगिरी करणारा तोतया पोलीस गजाआड

- Advertisment -

ताज्या बातम्या