Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या“…नाहीतर एकेकाच्या कानाखालीच”; अजितदादा का भडकले?

“…नाहीतर एकेकाच्या कानाखालीच”; अजितदादा का भडकले?

पुणे | Pune

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आपल्या खुमासदार शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बोलीभाषेतून ते जनतेशी संवाद साधतात. तर, कार्यकर्त्यांनाही ते तशाच शब्दांत मार्गदर्शन करत असतात. गेल्या काही दिवसांपासून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP Meeting) आढावा बैठक सुरू आहे. या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी नेत्यांनी तंबी दिली आहे…

- Advertisement -

“मुळशीच्या लोकांना पदे दिली आहेत. पदासाठी भांडायचे नाही. नाहीतर एकेकाच्या कानाखाली आवाजच काढेन. बाकी काही नाही करायचे”, असे अजित पवार म्हणाले. “यातून तुमची बदनामी होत नाही. पवार साहेबांची बदनामी होते. हा कोणता फाजिलपणा सुरू आहे?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

१७०० कोटी पाण्यात! गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला, थरारक VIDEO आला समोर

मी टोकाचा वागेन मग, असा सख्त इशाराच अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. एकदा पदाधिकारी झाल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतो. तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी असता. पण ही कोणती पद्धत आहे? हे मी नवीनच बघत आहे, असे ते म्हणाले.

पक्षातील सर्वांनी लक्षात ठेवा, मतभेद असतात. पण आपल्यासोबत चांगला इतिहास, परंपरा असताना आपण पक्षाची बदनामी का करायची? पक्षाची बदनामी करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. पक्षाची बदनामी करणाऱ्यांना मी सोडणार नाही. मी त्यांच्याकडून सगळी पद आणि जबाबदाऱ्या काढून घेईल असेही पवार यावेळी म्हणाले आहेत.

Train Accident : मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरले; ओडिशात पुन्हा रेल्वेचा अपघात

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवणार असल्याने आपली ताकद असलेल्या जागांची चाचपणी सर्व पक्षांकडून केली जातेय. त्यासाठी पुण्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत आमदार चेतन तुपे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक नेते उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या