Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी दत्ता गायकवाड, उपाध्यक्षपदी कोरडे बिनविरोध

नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी दत्ता गायकवाड, उपाध्यक्षपदी कोरडे बिनविरोध

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक (Election) बिनविरोध (Unopposed) पार पडली. यावेळी बँकेच्या अध्यक्षपदी दत्ता गायकवाड तर उपाध्यक्षपदी मनोहर कोरडे यांची निवड झाली….

- Advertisement -

नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेची (Nashik Road Deolali Vyapari Bank) पंचवार्षिक निवडणूक ११ जून रोजी संपन्न झाली. या निवडणुकीत प्रथमच सत्तारूढ सहकार पॅनलचे १९ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. परिणामी सदरची निवडणूक २१ जागांसाठी (Seats) होणार होती. परंतु, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस अगोदर ५६ उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते.

मात्र, निवडणूक प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून परिवर्तन पॅनलचे हेमंत गायकवाड, अशोक सातभाई व त्यांच्या इतर उमेदवारांनी निषेध नोंदवत आपल्या इतर उमेदवारांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात सहकार पॅनलचे उमेदवार शिल्लक राहिले. यामुळे या निवडणुकीत बँकेच्या इतिहासात प्रथमच १९ संचालक बिनविरोध निवडून आले.

Accident News : ट्रकची मॅजिक प्रवासी रिक्षाला धडक; आठ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

तर अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी परिवर्तन पॅनलच्या उमेदवार संगीता गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्यामुळे महिला गटाच्या दोन जागांसाठी निवडणूक लादली गेली. त्यामुळे सहकार पॅनलच्या कमल आढाव व रंजना बोराडे आणि परिवर्तन पॅनलच्या संगीता गायकवाड या निवडणुकीच्या रिंगणात राहिल्या.

त्यानंतर या दोन जागांसाठी (दि. ११ जून) रोजी निवडणूक संपन्न झाली. यानंतर १२ जून रोजी मतमोजणी झाल्यानंतर कमल आढाव व रंजना बोराडे या सहकार पॅनलच्या महिला उमेदवार प्रचंड मताने निवडून आल्या. सदरची निवडणूक सहकार् पॅनलचे नेते दत्ता गायकवाड व निवृत्ती अरिंगळे याच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती.

“तेव्हा फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील, म्हणून…”; शरद पवारांचा खोचक टोला

तसेच निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी घोषित केले होते. त्यानुसार आज सोमवार (दि.२६ जून) रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक व्यापारी बँकेच्या सभागृहात संपन्न झाली. त्यात अध्यक्षपदी दत्ता गायकवाड (Datta Gaikwad) तर उपाध्यक्षपदी मनोहर कोरडे (Manohar Korde) हे बिनविरोध निवडून आले. यावेळी दोघांची निवड होताच उपस्थित संचालकांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

अजित पवारांच्या ‘त्या’ इच्छेवर शरद पवारांचे उत्तर; म्हणाले, “पक्षात कोणती जबाबदारी…”

दरम्यान,याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने, संचालक निवृत्ती अरिंगळे, जगन आगळे, सुनील आडके, श्रीराम गायकवाड, मनोहर कोरडे, अरुण जाधव, सुनील चोपडा, अशोक चोरडिया, डॉ.प्रशांत भुतडा, वसंत अरिंगळे, रामदास सदाफुले, सुधाकर जाधव, रमेश धोंगडे, योगेश नागरे, नितीन खोले, गणेश खरजुल, विलास पेखळे, कमल आढाव, रंजना बोराडे, यांच्यासह बँकेचे अधिकारी कर्मचारी व विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या