Friday, May 3, 2024
Homeनगरअपघात प्रकरणातील मद्यपी आरोग्य अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल नाही

अपघात प्रकरणातील मद्यपी आरोग्य अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल नाही

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवून एका युवकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या येथील आरोग्य अधिकार्‍याविरुद्ध दुसर्‍या दिवशीही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मयत युवकाच्या नातेवाईकांची फिर्याद घेण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

रविवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास तालुक्यातील वडगाव पान परिसरातील टोल नाक्याजवळ अपघात झाला होता. अपघातामधील कार ही एका आरोग्य अधिकार्‍याची असून मद्य प्राशन करून गाडी चालवत त्याने एकाचा बळी घेतला आहे. अपघातानंतर त्याने खाली उतरून वाहनाची ओळख पटू नये यासाठी कारच्या मागील व पुढील नंबर प्लेट काढून घेतल्या. यानंतर तो तेथून पसार झाला. हा वैद्यकीय अधिकारी महागड्या गाडीतून प्रवास करत होता.

संगमनेर येथील स्थानिक स्वराज्य संस्थेत अनेक वर्षांपासून तो आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहत आहे. विविध कारणामुळे त्याची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. असे असतानाच रविवारी रात्री त्याच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा बळी जाऊनही पोलिसांनी या आरोग्य अधिकाराविरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र काल शहर पोलिसांनी मालदाड रोड परिसरात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो मिळून आला नाही.

शासकीय अधिकारी असल्यामुळे त्याला या अपघातामधून वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. काल हा आरोग्य अधिकारी ड्युटीवर हजर झाला नसल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या