Friday, May 3, 2024
Homeनगरनिरीक्षक कटके, उपनिरीक्षक हुलगे यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक

निरीक्षक कटके, उपनिरीक्षक हुलगे यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) तत्कालीन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल कटके व नियंत्रण कक्षातील डायल 112 युनिटचे पोलीस उपनिरीक्षक अंबादास हुलगे यांना स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती यांचे पोलीस पदक जाहीर झाले आहे.

- Advertisement -

स्वातंत्र्यदिनी देशभरातील 954 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत. पोलीस दलात उल्लेखनीय सेवेबद्दल ही पदके दिली जातात. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी नगर जिल्हा पोलीस दलात उलेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी आश्वी, कोपरगाव पोलीस ठाण्याबरोबर एलसीबीची धुरा यशस्वी संभाळली होती. सध्या ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली येथे कार्यरत असून त्यांनी पोलीस दलातील केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपतीचे पोलीस पदक जाहीर झाले आहेत.

डायल 112 युनिटचे पोलीस उपनिरीक्षक अंबादास हुलगे यांची पोलीस दलात 34 वर्षे सेवा पूर्ण झाली आहे. त्यांनी संगमनेर शहर, कर्जत, एलसीबी, तसेच पोलीस अधीक्षक यांचे चालक म्हणून काम केले आहे. उपनिरीक्षक हुलगे सध्या नियंत्रण कक्षातील डायल 112 युनिट येथे कार्यरत आहे. निरीक्षक कटके व उपनिरीक्षक हुलगे यांचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर आदींनी अभिनंदन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या