Friday, May 3, 2024
Homeनाशिकबारावीचे परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध

बारावीचे परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध

नाशिक । प्रतिनिधी

येत्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार्‍या इयत्ता बारावीच्या परीक्षेकरीता आवश्यक असलेले हॉलतिकीट (प्रवेशपत्र) ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध झाले आहे. मंगळवार (ता.२१) पासून हॉलतिकीट उपलब्ध असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना आपआपल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून हॉलतिकीटाचे वितरण केले जाणार आहे.

- Advertisement -

शिक्षण मंडळाने हॉलतिकीट उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना दिशानिर्देशदेखील जारी केलेले आहेत. ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन मंगळवार पासून कॉलेज लॉगइन पर्यायाद्वारे डाऊनलोड करून घेता येणार आहे. महाविद्यालयांनी प्रवेशपत्र प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कुठल्याही स्वरूपातील शुल्क आकारले जाऊ नये. तसेच हॉलतिकीटाच्या प्रिंटवर मुख्याध्यापकांचा, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी घ्यायची आहे.

हॉलतिकीटवरील विषय व माध्यमात बदल असतील तर त्यांच्या दुरूस्त्या विभागीय मंडळात जाऊन करायच्या आहेत. विद्यार्थ्यांकडून हॉलतिकीट गहाळ झाल्यास संबंधित महाविद्यालयांनी पुर्नप्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत (ड्युप्लीकेट) असा शेरा लिहून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यायचे आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून, त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. कुठल्याही स्वरूपातील तांत्रिक अडचण उद्भवल्यास विभागीय मंडळ कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनदेखील केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या