Thursday, May 2, 2024
Homeनाशिकसंत जनार्दन स्वामी उत्तराधिकारी सुनावणी 11 मार्च ला होणार

संत जनार्दन स्वामी उत्तराधिकारी सुनावणी 11 मार्च ला होणार

नाशिक । त्र्यंबकेश्वर येथील श्री सदगुरू जनार्दन स्वामी ट्रस्टतर्फे श्री जनार्दन स्वामींच्या उत्तराधिकारीपदाबाबत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची पुढील सुनावणी 11 मार्चला होणार आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. जाधव यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात आज श्री शांतिगिरी महाराज यांचे वकील तथा विरोधी पक्षकारांपैकी अ‍ॅड. प्रभाकर बर्वे यांची साक्ष झाली. त्यात ट्रस्टचे वकील रवींद्र ओढेकर यांनी त्यांची उलट तपासणी घेतली. यापूर्वी कोपरगाव व वैजापूर न्यायालयांनी दिलेल्या निकालाच्या प्रती त्यांनी सादर केल्या.

- Advertisement -

संत जनार्दन स्वामींनी आपला उत्त्तराधिकारी म्हणून कोणालाही नेमलेले नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. संत जनार्दन स्वामी यांच्या समाधीनंतर त्यांच्या उत्तराधिकारीपदाबाबत वाद निर्माण झाला होता.

शांतिगिरी महाराज यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील श्री सदगुरू जनार्दन स्वामी ट्रस्टतर्फे शांतीगिरी महाराजांसह 8 ते 9 जणांविरोधात 17 वर्षांपूर्वी न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्यात आला आहे. या दाव्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या