Sunday, May 5, 2024
Homeनाशिकबोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाचा अनोखा उपक्रम; तुमचाही उर आभिमानाने भरून येईल!

बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाचा अनोखा उपक्रम; तुमचाही उर आभिमानाने भरून येईल!

किशोर चौधरी । प्रत्येकाच्या जीवनात आनंद असावा त्याचे जीवन हे इतरांसारखे फुलावे, यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात प्रत्येकाला जीवनात आल्यानंतर व मोठा झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते. अन्नदान करण्यावर जास्त भर दिला जातो; त्यातल्या त्यात मनात असलेल्या लहान बालकांविषयीची सर्वांनाच ओढ असते. अशा ठिकाणी आपल्या लग्नानिमित्ताने आपणही काहीतरी दिले पाहिजे, असा एक संदेश कल्पेश चांदोरेकर या युवकाने घालून दिला आहे.

आज (दि.१४) फेब्रुवारी रोजी कल्पेश विवाहबंधनात पडला असून आपल्या लग्नाची आठवण म्हणून अनाथ बालकांना काही गोडधोड खाऊ घालता आले तर आठवणीतला दिवस व येऊ घातलेल्या अनाथ मुलांचा आशीर्वाद आपल्यासाठी उपयोगी पडेल या उद्देशाने कल्पेश ने तहानलेल्यांना पाणी द्या व भुकेल्यांना अन्न द्या यातच खरा भगवंंत आहे.

- Advertisement -

या गाडगेबाबांच्या तत्त्वाप्रमाणे श्री साई चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संचलित आधारतीर्थ आश्रम अंजनेरी येथे जात शेतकर्‍यांच्या निवासी निराधार मुले व मुलीना त्या ठिकाणी जाऊन सर्वांना पुरी, छोले भाजी, बटाटा सुकी भाजी, मसालेभात, पापड, खिर मनसोक्त खाऊ घालून आशीर्वाद घेतला. खरंतर लग्नासाठी खूप मौजमजा करून लग्न लावले जातात पण आपल्या लग्नातील खारीचा वाटा कुणाच्यातरी उपयोगी येऊ शकतो हेच कल्पेशने दाखवून दिले आहे.

प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातापेक्षा मदतीचा एक हात अधिक श्रेष्ठ असतो हे ब्रीदवाक्य असलेल्या व व शासकीय अनुदान नसलेल्या नेहा ट्रस्टसाठी मदतीचा हात तितकाच महत्वाचा आहे. कल्पेश सारख्या कल्पना मनात येऊन अनेकांनी पुढे येत हा संदेश घेतल्यास शेतकर्‍यांनी शेतीच्या कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या या निराधार मुलांना नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल. व जीवनात यशस्वी होण्याचे प्रेरणादेखील मिळू शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या