Friday, May 3, 2024
Homeनाशिकइगतपुरी : हरभ-याचे उत्पादन घटण्याची शक्यता; वातावरण बदलाचा पिकांना फटका

इगतपुरी : हरभ-याचे उत्पादन घटण्याची शक्यता; वातावरण बदलाचा पिकांना फटका

कवडदरा : तालुक्यातील कवडदरा,घोटी खुर्द,पिपंळगाव,साकूर परीसरात मोठ्या प्रमाणात हरभरा उत्पादन घेतले जाते.काही परीसरात हरभरा काढणीसही सुरूवात झाली आहे.ढगाळ वातावरण तसेच रोज कमी- जास्त होणारी थंडी व धुक्याचा विपरीत परीणाम हरभ-याच्या उत्पादनावर झाल्याचे दिसून येते.

परीसरात काही भागात हरभरा काढणीस वेग आला आहे.माञ बदलते हवामान,अळीचा प्रादुर्भाव,सातत्याने पडणारे धुके आणि कमी जास्त होणारी थंडी यामुळे हरभरा उत्पादनात घट झाल्याचे दिसत आहे.यंदा खरीपाचे पीक अवकाळी पाऊसाअभावी हातातून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यामुळे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हे नुकसान रब्बी हंगामात भरुन निघेल,अशी शेतकऱ्यांना आशा होती.माञ तसे झालेले दिसत नसून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

यंदा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभरा,गहू आदी पीकाचे उत्पादन घेतले.यावर्षी गहुबरोबरच हरभ-याचे क्षेत्रही अधिक प्रमाणात आहे.पुढील पीके घेता यावीत,तसेच अर्थार्जनही व्हावे यासाठी हरभ-याची पेरणी केली जाते.बाजारपेठेत हरभ-याला आणि डाळीलाही सततच मागणी असते.त्यामुळे परीसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात देशी व संकरीत जातीच्या हरभ-याची पेरणी करतात.

यंदा रब्बीच्या सुरवातीस परतीच्या पाऊसाचा फटका बसला;तसेच जमीनीची आर्द्रता जास्त असल्याने हरभ-याला मर रोगाची लागण झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी पहीली पेरणी वखरणी करुन दुबार पेरणी केली आहे.माञ वातावरण बदलाने उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.या परीस्थीतीत केलेला खर्च निघणेही कठीण होणार असल्याचा प्राथमिक अंदाज परीसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

हरभ-याला एक किंवा दोन फवार-या कराव्या लागतात.परंतु यावेळी दोन ते चार फवारण्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना कराव्या लागल्या असून आर्थिक झळ सोसावी लागली आहे.त्यातच वाढलेली मजुरी व एकीकडे मंजुराची कमतरता यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या